ठळक मुद्देजानेवारीत नाही पण फेब्रुवारीपासून लग्नाचे मुहूर्त सुरू होतील. यासाठी लग्नघरात आता धावपळ सुरूच असेल.सध्या प्री-वेडिंग शूटचा प्रचंड बोलबाला आहे. वधू आणि वराच्या डोक्यात एकच प्रश्न असेल की प्री-वेडिंग शूट कुठे करायचं? त्यामुळे प्रत्येक जोडप्याला लग्नाच्या बंधनात अडकण्याआधी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी प्री-वेडिंग शूट करण्याची इच्छा होतेय.

मुंबई : जानेवारीत नाही पण फेब्रुवारीपासून लग्नाचे मुहूर्त सुरू होतील. यासाठी लग्नघरात आता धावपळ सुरूच असेल. पण वधू आणि वराच्या डोक्यात एकच प्रश्न असेल की प्री-वेडिंग शूट कुठे करायचं? सध्या प्री-वेडिंग शूटचा प्रचंड बोलबाला आहे. त्यामुळे प्रत्येक जोडप्याला लग्नाच्या बंधनात अडकण्याआधी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी प्री-वेडिंग शूट करण्याची इच्छा होतेय. पण डेस्टिनेशन प्री-वेडिंग शूट करण्यासाठी तुमच्याकडे बजेट नसलं तरीही चालेल. कारण आपल्या मुंबईतही असे ठिकाणं आहेत जिथं तुम्ही अगदी मोफत प्री-वेडिंग शूट करू शकाल. चला पाहूया अशीच काही रोमॅटिंग स्थळं.

गेट वे ऑफ इंडिया

मुंबईतील सगळ्यात प्रसिद्ध असं ठिकाण म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. प्री-वेडिंग शूटसाठी हे ठिकाण एकदम परफेक्ट आहे. ब्रिटिशकालीन बांधकामाचं एक उत्तम नमुना आहे. इथं सायंकाळच्या वेळेस जरा जास्तच गर्दी असते. त्यामुळे कमी गर्दी असेल तेव्हाच इथं जा. शक्यतो सकाळी लवकर गेलात तर कमी गर्दी मिळेल, तसेच फोटो काढण्यासाठी उत्तम प्रकाशही मिळेल. गेटवेच्या समोरच ताज हॉटेल आहे. या हॉटेलच्या समोर अनेक सेल्फी काढण्याऱ्यांची गर्दी असते. त्यामुळे तुम्हीही तुमचा एखादा गोड फोटो काढायला इथं काढायला विसरू नका. 

संजय गांधी नॅशनल पार्क

बोरीवलीचं संजय गांधी नॅशनल पार्क हे कित्येक जोडप्यांसाठी हक्काचं ठिकाण आहे. त्यामुळे आपली पहिली भेट इथं झाली म्हणून कित्येक कपल्स आपलं प्री-वेडिंग शूट करायला इथंच येत असतात. मोठ्या परिसरात पसरलेल्या या पार्कमध्ये तुम्हाला तलावापासून ते हिरवळीपर्यंत सारं काही मिळेल. ए‌‌वढंच नव्हे तर जरा पुढे गेलात तर तुम्हाला कान्हेरी लेणीही मिळेल. त्यामुळे तुम्हाला तुमचं प्री-वेडिंग शूट वेगवेगळ्या लोकेशन्सवर करण्याची इच्छा असेल तर संजय गांधी नॅशनल पार्क हे सगळ्यात बेस्ट आहे. कारण या एकाच ठिकाणी तुम्हाला छान लोकेशन्स मिळू शकतील. 

आणखी वाचा - प्री-वेडींग शूटसाठी पुण्यातील काही आकर्षक ठिकाणं

हँगिग गार्डन

गिरगाव चौपाटीच्या अगदीच समोर असलेलं हे हँगिग गार्डनही प्री-वेडिंग शूटसाठी फार प्रसिद्ध आहे. चहूबाजूने पसरलेली झाडं तुमच्या फोटोला चांगला लूक देतील. पण सकाळी लवकर किंवा सायंकाळी जरा उशीराच इथं फोटो काढायला जा. कारण मधल्या वेळात इथं फार गर्दी असते. त्यामुळे तुम्हाला हवे तसे फोटो काढता येणार नाही. तिथं जवळच निपन सी रोड आहे. तिकडेही फोटो काढायला विसरू नका. तो भागही फार सुंदर आहे. 

मरिन ड्राईव्ह

याआधी मरिन ड्राईव्हविषयी खूप काही ऐकलंय, वाचलंय. त्यामुळे या स्थळाविषयी अधिक माहिती देण्याची गरज नाही. या परिसरात नैसर्गिकत: रोमॅन्टिक फिलींग येतं. त्यामुळे इकडे साधा सेल्फी काढायलाही मुंबईकरांना आवडतं. मग कुणाला आपल्या लाईफ पार्टनरसोबत इथं फोटोशुट करायला का नाही आवडणार? हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. त्यामुळे इथं शांतता मिळणं जरा कठीणच आहे. पण तुमच्याकडे संयम असेल आणि गर्दीला सावरण्याचं कसब असेल तर इथं नक्की शूट करा. क्वीन नेकलेस म्हणून ओळखलं जाणारा मरिन ड्राईव्हवर रात्रीही शूट करायला विसरू नका. इकडची प्रकाशयोजना भारी असते. त्यामुळे तुमच्या फोटोला नक्कीच चारचाँद लागतील.

जुहू बीच

जुहू बीच हे सुद्धा जोडप्यांसाठी एक प्रसिद्ध बीच आहे. त्यामुळे इकडे नेहमीच जोडप्यांची वर्दळ असते. तसंच, आजूबाजूलाही अनेक छान स्थळं असल्यानं फोटोग्राफर्स इथं प्री-वेडिंग फोटो शूट करण्याचा पर्याय देतात. सूर्यास्त होतानाचं दृष्य अत्यंत मोहक असतं. त्यामुळे एखादा सूर्यास्ताच्या वेळेत फोटो काढायला विसरू नका. सकाळच्या वेळी जरा इथं कमी गर्दी असते. त्यामुळे बाकीचं शूट तुम्ही सकाळी करून घ्या आणि थोडासा संयम ठेवून सूर्यास्ताच्या वेळीही शूट करा. 


Web Title: places for pre-wedding shoot in mumbai
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.