गुगलवर आठवीत शिकणाऱ्या मराठमोळ्या पिंगलाचे डुडल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 07:32 AM2018-11-15T07:32:46+5:302018-11-15T07:34:36+5:30

देशातील ७५ हजार स्पर्धकांचा सहभाग : बालदिनानिमित्त भारताचे माजी पंतप्रधान पंडित नेहरूंना अभिवादन

Pingala's doodle in the Marathomoleo, who learns eight on Google | गुगलवर आठवीत शिकणाऱ्या मराठमोळ्या पिंगलाचे डुडल

गुगलवर आठवीत शिकणाऱ्या मराठमोळ्या पिंगलाचे डुडल

Next

मुंबई : गुगल नेहमीच खास डुडल तयार करून अनेक मान्यवरांना सलाम करत असते. या वेळीही गुगलने बालदिनाच्या निमित्ताने एक खास डुडल तयार केले. लहान मुले आणि भारताचे माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांनी देशाला दिलेल्या विज्ञान-तंत्रज्ञानाची भेट या दोन्ही गोष्टींवर गुगलने खास डुडल तयार केले आहे. मात्र, या डुडलचे विशेष म्हणजे ते मराठमोळ्या, मुंबईकर पिंगला मोरे हिचे आहे. रात्री १२ वाजता गुगल इंडियाने तिचे डुडल गुगलच्या होमपेजवर अपलोड करून त्यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेची विजेती म्हणून पिंगला मोरे हिच्या नावाची घोषणा केली.

गुगलने बालदिनानिमित्त चित्रकला स्पर्धा आयोजित केली आणि त्यासाठी देशभरातून अर्ज मागविले. या स्पर्धेची थीम ‘व्हॉट इन्स्पायर्स मी’ म्हणजेच मला प्रेरणा देणारी गोष्ट अशी होती. देशभरातील तब्बल ७५ हजार विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. मुंबईतील जे. बी. वाच्छा शाळेत आठवीत शिकणाऱ्या पिंगला हिनेही या स्पर्धेत भाग घेतला. परीक्षेच्या काळातही पिंगलाने लक्षवेधी डुडल तयार करून प्रथम पारितोषिक पटकाविले व पंडित नेहरूंना अभिवाद केले. गुरुवारी गुगलच्या होमपेजवर दिवसभर तिचे डुुडल झळकत होते. पिंगलाला चित्रकलेची आवड असून, तिने एलिमेंटरीच्या परीक्षेत राज्यात पाचवा क्रमांक पटकाविला आहे. आतापर्यंत चित्रकलेच्या बºयाच आंतरराष्ट्रीत स्पर्धेतदेखील तिने पारितोषिके मिळविली आहेत.

अंतिम २० स्पर्धकांचा
गुगलकडून सन्मान

एकूण ७५ हजार मुलांमधून अंतिम २० जणांची निवड गुगलमार्फत करण्यात आली. त्यांची प्रत्येकी २ प्रमाणे ५ गटांत विभागणी करून, त्यांना गुगलमार्फत दिल्लीला निमंत्रित करण्यात आले. तेथे त्यांनी काढलेल्या चित्रांमागची कल्पकता यावर सादरीकरण करण्यास सांगितले. शिवाय युट्यूबवर व्हिडीओ कसे अपलोड होतात, बलून आटर््स, प्रिटिंगच्या तंत्राची माहिती मुलांना गुगलमार्फत देण्यात आली.

चित्राला पारितोषिक मिळेल, असे वाटत होते, पण पहिला क्रमांक मिळेल, असे वाटले नव्हते. या संदर्भात गुगलकडून फोन आला, त्या वेळी खूप आनंद झाला, तो व्यक्त करण्यास शब्दच नव्हते. भविष्यातही पिंगलाची ही आवड आम्ही जपणार असून, तिला प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचा प्रयत्न करू.
- रूपाली मोरे, पिंगलाची आई.

आठवीत शिकणाऱ्या मुंबईकर पिंगला मोरे हिने लक्षवेधी डुडल तयार करून प्रथम पारितोषिक पटकाविले.
 

Web Title: Pingala's doodle in the Marathomoleo, who learns eight on Google

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.