Petrol price at the rate of 9 paise from MNS today | मनसेकडून आज ९ रुपये स्वस्त दराने पेट्रोलवाटप
मनसेकडून आज ९ रुपये स्वस्त दराने पेट्रोलवाटप

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 50 व्या वाढदिवसाचे निमित्त साधत, मनसैनिकांकडून गुरुवार, १४ जून रोजी भाखळ्यातील विकी हॉटेलसमोरील पेट्रोलपंपावर ९ रुपये स्वस्त दराने दुचाकीस्वारांना पेट्रोलवाटप करण्यात येणार आहे. भायखळा विधानसभेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. इंधनदरवाढीने मुंबईकर होरपळत असताना राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनसेकडून थोडासा दिलासा देण्याचा हा प्रयत्न असल्याची माहिती मनसे विधानसभा अध्यक्ष विजय लिपारे यांनी सांगितले. ते म्हणाले, राज ठाकरे यांचा गुरुवार, १४ जूनला ५०वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने भायखळ्यातील विकी हॉटेलसमोरील पेट्रोलपंपावर फक्त दुचाकीस्वारांना पेट्रोलचा गुरुवारी जो दर असेल, त्याहून ९ रुपये स्वस्त दराने पेट्रोलवाटप केले जाईल. सकाळी ९ ते दुपारी १ वाजेदरम्यान हा उपक्रम राबविण्यात येईल. 

 .


Web Title: Petrol price at the rate of 9 paise from MNS today
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.