सलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 08:17 AM2018-05-28T08:17:19+5:302018-05-28T08:20:21+5:30

कर्नाटक निवडणुकीनंतर सलग पंधराव्या दिवशीही पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.

petrol diesel rate hike continues on 15th day | सलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं

सलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं

Next

मुंबई - कर्नाटक निवडणुकीनंतर सलग पंधराव्या दिवशीही पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईमध्ये आज पेट्रोलच्या प्रतिलिटर दरात 12 पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल आज प्रतिलिटर 86 रुपये 08 पैसे दरानं तर डिझेलचे प्रतिलिटर 73 रुपये 64 पैशांना दरानं मिळत आहे. सलग पंधराव्या दिवशी झालेल्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशासहीत डोकंदेखील गरम झालं आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंवरही झाल्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचे चटके बसत आहेत.

इंधन दरवाढीची ‘गाडी’ थांबेना! 



असे वाढले राज्यातील पेट्रोलचे दर - 
१५ मे - ८२.७९ रुपये
१६ मे - ८२.९४ रुपये
१७ मे - ८३.१६ रुपये
१८ मे - ८३.४५ रुपये
१९ मे - ८३.७५ रुपये
२० मे - ८४.०७ रुपये
२१ मे - ८४.४० रुपये
२२ मे - ८४.७० रुपये
२३ मे - ८४.९९ रुपये
२४ मे - ८५.२९ रुपये
२५ मे - ८५.६५ रुपये
२६ मे - ८५.७८ रुपये
२७ मे - ८५.९६ रुपये
२८ मे - ८६.0८ रुपये  

दरम्यान, कर्नाटक निवडणुकीनंतर वाढत असलेला इंधन दरवाढीचा डोंगर कमी करण्यासाठी सरकार पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या (वस्तू आणि सेवा कर) कक्षेत आणण्याचा विचार करत असले तरी त्यामुळे कोणताच फायदा होणार नाही, असा दावा जीएसटी नेटवर्क पॅनलचे अध्यक्ष सुशील मोदी यांनी केला आहे. जीएसटीत येऊनही इंधनाचे दर कमी होणार नाहीत, राज्येही अतिरिक्त कर लावतील, असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे सरकारच्या ‘उपाय’योजनांच्या विचारांनाच हरताळ फासला गेला आहे.

स्वत: बिहारचे वित्तमंत्री असलेले मोदी म्हणाले, जगभरात जिथे-जिथे जीएसटीसारखा कर आहे, तिथे राज्य सरकार किंवा स्थानिक प्रशासनाला स्वत:चा उपकर किंवा शुल्क आकारण्याचा अधिकार आहे. भारतातही जीएसटीतील सर्वाधिक कर मर्यादेवर स्वत:चे शुल्क लावण्याचा अधिकार राज्य सरकारांना दिला आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलला सर्वाधिक २८ टक्के जीएसटीच्या कक्षेत आणले तरी राज्य सरकार स्वत:चे महसुली नुकसान होऊ नये यासाठी उपकर किंवा शुल्क लावतीलच. त्यामुळेच या निर्णयाचा इंधनाच्या दरांवर अत्यंत माफक परिणाम होईल. दर क्वचितच कमी होऊ शकतील. शिवाय ‘एक देश एक कर’ या योजनेलाही हरताळ फासला जाईल.
 

कायम असमतोल
मागील चार वर्षांची आकडेवारी पाहिल्यास याआधी १७ मे २०१६ ते १ जून २०१६ दरम्यान पेट्रोलच्या दरात ४.०६ रुपये प्रति लीटरने वाढ झाली होती. १६ आॅगस्ट २०१६ ते १६ सप्टेंबर २०१६ दरम्यान पेट्रोल ५.६० रुपये प्रति दराने वाढले होते. नोव्हेंबर २०१६ ते जानेवारी २०१७ या दरम्यान पेट्रोलच्या दरात ५.१७ रुपये प्रति लीटर वाढ झाली होती. १० मार्च ते ५ एप्रिल २०१५ दरम्यानही पेट्रोल दर ५.२१ रुपये वाढविले होते. डिझेल एप्रिल ते मे २०१५ या काळात ५.६० रुपये प्रति दराने डिझेलचे दर वधारले होते. मे २०१५ मध्ये डिझेल २.९९ रुपये महागले आले होते.

२०११-१२ मध्ये १७६ दिवस दर स्थिर : यूपीए सरकारच्या काळातही डिसेंबर २०११ ते मे २०१२ दरम्यान पेट्रोलच्या दरात तब्बल ७.९१ रुपये प्रति लीटरची वाढ करण्यात आली होती, पण त्या वेळी १ डिसेंबर २०११ ते २४ मे २०१२ हे तब्बल १७६ दिवस पेट्रोल ७०.६६ रुपये प्रति लीटरवर स्थिर होते.

Web Title: petrol diesel rate hike continues on 15th day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.