पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांची उन्हाळी विशेष ब्लॉकमधून सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 06:00 AM2019-04-22T06:00:00+5:302019-04-22T06:00:13+5:30

श्चिम रेल्वे मार्गावर उन्हातील ब्लॉक घेण्यात येणार नसल्याने पश्चिम रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची उन्हाळी विशेष ब्लॉकमधून सुटका झाली आहे. ​​​​​​​

Passengers of the Western Railway route get rid of the summer special block | पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांची उन्हाळी विशेष ब्लॉकमधून सुटका

पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांची उन्हाळी विशेष ब्लॉकमधून सुटका

Next

मुंबई : मध्य आणि हार्बर मार्गावर उन्हात रेल्वे रुळांचे काम करण्यासाठी मागील आठवड्यात अघोषित ब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. मात्र पश्चिम रेल्वे मार्गावर उन्हातील ब्लॉक घेण्यात येणार नसल्याने पश्चिम रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची उन्हाळी विशेष ब्लॉकमधून सुटका झाली आहे.

उन्हाळ्याच्या काळात वाढत्या उन्हामुळे रेल्वे रूळ प्रसरण पावत असल्याने रेल्वे रुळांची दुरुस्ती केली जाते. या दुरुस्तीसाठी (डिस्टँकिंग) मागील आठवड्यात १६ एप्रिल रोजी मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते उल्हासनगर, तर हार्बर मार्गावर वडाळा ते शिवडी, रे रोड ते कॉटनग्रीन यादरम्यान अघोषित ब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

मध्य, हार्बर मार्गांप्रमाणेच पश्चिम रेल्वे मार्गावरही अशाच प्रकारे अघोषित ब्लॉक घेण्यात येईल, अशी भीती प्रवाशांना होती. मात्र, पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचे काम रविवारच्या मेगाब्लॉकमध्ये करण्यात येत असल्याने पश्चिम रेल्वे मार्गावर उन्हात विशेष ब्लॉक घेणार नाही, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मध्य रेल्वेवर दुपारच्या वेळेस ब्लॉकची शक्यता
मध्य रेल्वे मार्गावरून लोकल, मालगाडी, मेल, एक्स्प्रेस चालविण्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक होत आहे. वाढते ऊन आणि या मार्गावरील गाड्यांचे ट्रॅफिक यामुळे रेल्वे रूळ प्रसरण पावत असल्याने अघोषित ब्लॉक घेण्यात येईल. त्यादृष्टीने नियोजन करण्यात येणार असल्याची शक्यता रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे. दुपारी गर्दी कमी असल्याने मध्य रेल्वे मार्गावर दररोज दुपारी १२ वाजल्यानंतर रूळ दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळेस ब्लॉक घेण्यात येईल, असा अंदाज आहे. मात्र गेल्या आठवड्याप्रमाणे अघोषित ब्लॉक न घेता या वेळी प्रत्येक स्थानकावर ब्लॉकची आणि गाड्यांची पूर्वसूचना देण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाºयांनी सांगितले.

Web Title: Passengers of the Western Railway route get rid of the summer special block

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.