मंत्र्यांप्रमाणेच 'सरपंचांचाही शपथविधी सोहळा, प्रस्तावास पंकजा मुंडेंची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 11:07 PM2019-07-16T23:07:40+5:302019-07-16T23:10:14+5:30

राज्य निवडणूक आयोगाशी चर्चा केल्यानंतर ग्रामविकास विभागाने यासंदर्भात जो प्रस्ताव सादर केला होता, त्यास मान्यता देण्यात आली आहे

Pankaja Munde's proposal for the swearing-in ceremony to sarpanch, like the ministers, | मंत्र्यांप्रमाणेच 'सरपंचांचाही शपथविधी सोहळा, प्रस्तावास पंकजा मुंडेंची मान्यता

मंत्र्यांप्रमाणेच 'सरपंचांचाही शपथविधी सोहळा, प्रस्तावास पंकजा मुंडेंची मान्यता

googlenewsNext

मुंबई - सरपंचपदी निवडूण आल्यानंतर आता सरपंच यांचाही शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मंत्री, आमदारांप्रमाणेच थेट जनतेतून निवडून आलेले सरपंचही आता पद आणि गोपनियतेची शपथ घेतील. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्रीपंकजा मुंडे यांनी नुकतीच या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची ग्रामपंचायतबाबत असलेली बांधिलकी आणि गावाच्या विकासाच्या दृष्टीने असलेली जबाबदारी याबाबत गावातील जनतेमध्ये तसेच लोकप्रतिनिधीमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या शपथ घेण्यामागचा उद्देश असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. 

राज्य निवडणूक आयोगाशी चर्चा केल्यानंतर ग्रामविकास विभागाने यासंदर्भात जो प्रस्ताव सादर केला होता, त्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 33(2)अन्वये जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेला अधिकारी पहिल्या सभेचे अध्यक्षस्थान स्विकारेल, पहिल्या सभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी अध्यासी अधिकारी थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच यांना शपथ देईल आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम, 1964 अवलंब करून कार्यवाही सुरू करेल. अध्यासी अधिका-यांनी गण संख्येसंबंधी कार्यवाही पूर्ण केल्यानंतर सरपंच हे पहिल्या सभेचे अध्यासी अधिकारी म्हणून काम पाहतील. अध्यासी अधिकारी म्हणून सरपंच ग्रामपंचायती मधील नवनियुक्त इतर सदस्यांना सामुदायिक शपथ देतील व त्यानंतर उपसरपंचांची निवडणूक पार पाडली जाणार आहे, असे प्रस्तावात नमुद करण्यात आले आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणूकीनंतर हा प्रस्ताव लागू होणार आहे. 

दरम्यान, आमदार, खासदार, मंत्री यानंतर आता संरपंचांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. तसेच, जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्य, पंचायत समिती सभापती आणि सदस्यांना शपथ देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचेही पंकजा मुंडेंनी म्हटले आहे. 
 

Web Title: Pankaja Munde's proposal for the swearing-in ceremony to sarpanch, like the ministers,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.