मुंबई : अर्चना नेवरेकर फाउंडेशनचा ‘संस्कृती कलादर्पण गौरव रजनी २०१५’ हा चित्र-नाट्य पुरस्कार सोहळा अंधेरी येथील अंधेरी स्पोटर््स कॉम्प्लेक्स येथे रविवारी संध्याकाळी पार पडला. संस्कृती कलादर्पण संस्थेच्या अध्यक्षा अर्चना नेवरेकर आणि संस्थापक अध्यक्ष चंद्र्रशेखर सांडवे यांच्या हस्ते ‘संस्कृती कलादर्पण कलागौरव’ हा पुरस्कार ज्येष्ठ कलावंत आशा काळे यांना प्रदान करण्यात आला.
गणपती, दुर्गेचे स्मरण करून सोहळ्याला दिमाखात सुरुवात झाली. पुष्कर श्रोत्री आणि क्रांती रेडकर यांच्या खुसखुशीत निवेदनाने कार्यक्रमात बहार आणली. या गौरव रजनीच्या पंधरा वर्षांच्या प्रवासाबद्दल सांगताना चंद्रशेखर सांडवे म्हणाले, ‘गेल्या पंधरा वर्षांत मराठी चित्रपटाने चाकोरीबाहेर पाऊल टाकले आहे. त्यात होणाऱ्या बदलानुसार संस्कृती कलादर्पणनेसुद्धा कात टाकली. या चित्रपटसृष्टीतील अनेक वेगवेगळ्या तंत्रज्ञ, कलावंतांचा सत्कार करून त्यांना योग्य तो सन्मान देण्याचा संस्कृतीचा प्रयत्न आहे.’
नाटक, चित्रपट आणि मालिका अशा एकूण तीन विभागांत पुरस्कार विभागून देण्यात आले. यातील नाटक विभागात ‘गोष्ट तशी गमतीची’, चित्रपट विभागात ‘एक हजाराची नोट’ आणि मालिका विभागात ‘कमला’ या मालिकेने अधिकाधिक पुरस्कारांवर आपले नाव कोरले.
पुरस्कार वितरणाबरोबरच कलावंतांच्या धमाल परफॉर्मन्समुळे सोहळ्याला आणखीनच रंगत आली. संस्कृती बालगुडेच्या कार्निव्हल डान्सवर सारेच थिरकले तर मानसी नाईक आणि आरती सोळंकी यांच्या परफॉर्मन्सला प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली. कमलाकर सातपुते, सुप्रिया पठारे आणि अंशुमन विचारे यांनी सोळाव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या किशोरवयीन मुलाच्या मानसिकतेचा वेध घेणारी नाटिका सादर केली. (प्रतिनिधी)

 

नाट्य विभाग 
१) सर्वोत्कृष्ट नेपथ्य -
नितीन नेरूरकर (त्या तिघांची गोष्ट)
२) सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना - भूषण देसाई (श्री शिवसमर्थ)
३) सर्वोत्कृष्ट संगीत - देवदत्त साबळे (परंपरा डॉट कॉम)
४) सर्वोत्कृष्ट लेखक - मिहिर राजदा (गोष्ट तशी गमतीची)
५) सर्वोत्कृष्ट साहाय्यक
अभिनेत्री- सुप्रिया पठारे (मदर्स डे)
६) सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता - सूर्यकांत देवळे (कळत नकळत) ७) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - लीना भागवत (गोष्ट तशी गमतीची)
८) सर्वोत्कृष्ट अभिनेता - मंगेश कदम (गोष्ट तशी गमतीची)
९) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- अद्वैत दादरकर (गोष्ट तशी गमतीची)
१०) सर्वोत्कृष्ट नाटक - गोष्ट तशी गमतीची (सोनल प्रोदाक्षंस आणि नाट्य सुमन)
लक्षवेधी अभिनेत्री घोषित - ज्ञानदा पानसे (त्या तिघांची गोष्ट), लक्षवेधी अभिनेता घोषित - शशांक केतकर (गोष्ट तशी गमतीची)
टीव्ही मालिका विभाग
च्विशेष लक्षवेधी मालिका - जयोस्तुते - कोठारे व्हिजन प्रा. लि. स्टार प्रवाह
च्विशेष लक्षवेधी अभिनेत्री घोषित - पल्लवी पाटील
च्सर्वोत्कृष्ट पदार्पण- अश्विनी कसर (कमला)
च्सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री - किशोरी अंबिये (देवयानी - स्टार प्रवाह)
च्सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता - सुशांत शेलार -
(असावा सुंदर स्वप्नांचा बंगला - कलर्स मराठी)
च्सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - दीप्ती केतकर (कमला - कलर्स मराठी)
च्सर्वोत्कृष्ट अभिनेता - हरीश दुधाडे (माझे मन तुझे झाले - कलर्स मराठी)
च्सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - अजय मयेकर (कमला - कलर्स मराठी)
च्सर्वोत्कृष्ट मालिका - कमला - दशमी क्रिएशन - कलर्स मराठी

न्यूज चॅनेल विभाग
च्सर्वोत्कृष्ट सूत्रधार पुरुष घोषित - अमित भंडारी - एबीपी माझा
च्सर्वोत्कृष्ट सूत्रधार स्त्री घोषित - वैदेही विशाल काणेकर - मी मराठी
च्सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम घोषित - प्रशांत अनासपुरे - झी २४ तास
च्सर्वोत्कृष्ट न्यूज चॅनेल - एबीपी 
माझा
च्उल्लेखनीय पत्रकारिता पुरस्कार घोषित - दिलीप ठाकूर

चित्रपट विभाग
१) सर्वोत्कृष्ट रंगभूषा - लोकमान्य : एक युगपुरुष २) सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक - संतोष फुटणे (लोकमान्य : एक युगपुरुष)
३) सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - संतोष मुळेकर (विटी-दांडू) ४) सर्वोत्कृष्ट गीतरचना - गुरू ठाकूर (लय भारी) ५) सर्वोत्कृष्ट संगीत - अमितराज (क्लासमेट्स) ६) सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - बेला शेंडे (क्लासमेट्स) ७) सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - अजय गोगावले (लय भारी) ८) सर्वोत्कृष्ट छायांकन - प्रसाद भेंडे (लोकमान्य : एक युगपुरुष) ९) सर्वोत्कृष्ट संकलन - फैजल - इमरान (क्लासमेट्स) १०) सर्वोत्कृष्ट संवाद - समीर विद्वांस ११) सर्वोत्कृष्ट पटकथा - श्रीकांत बोजेवार १२) सर्वोत्कृष्ट कथा - मधुगंधा कुलकर्णी (एलिझाबेथ एकादशी) १३) सर्वोत्कृष्ट बालकलाकार - निशांत भावसार (विटी-दांडू) १४) सर्वोत्कृष्ट खलनायक - शरद केळकर (लय भारी) १५) सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री - स्मिता तांबे (कॅण्डल मार्च ) १६) सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता - नीलेश दिवेकर (कॅण्डल मार्च ) १७) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - सई ताम्हणकर (गुरुपौर्णिमा) १८) सर्वोत्कृष्ट अभिनेता - सुबोध भावे (लोकमान्य) आणि सचिन खेडेकर (शटर), लक्षवेधी अभिनेता घोषित- रितेश देशमुख (लय भारी), १९) दिग्दर्शक - श्रीहरी साठे (एक हजाराची नोट ), प्रथम पदार्पण दिग्दर्शन - क्रांती रेडकर (काकण), सर्वोत्कृष्ट चित्रपट - एक हजाराची नोट (इन्फिनिटम प्रोडक्शन प्रा. लि.), लक्षवेधी चित्रपट - काकण (मॅगोरेंज प्रोडक्शन), २०) सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट - धनगरवाडा (राम लक्ष्मण चित्र), विशेष ज्युरी - ऊर्मिला कानिटकर, लक्षवेधी चित्रपट घोषित - लय भारी (सिनेमंत्र एंटरटेनमेंट)


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.