सेस्मिक सर्व्हेमुळे बोटी नांगरल्या, ओएनजीसीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 04:57 AM2019-01-07T04:57:07+5:302019-01-07T04:57:28+5:30

ओएनजीसीचे आदेश : ब्लास्टमुळे माशांना धोका, २५ फेब्रुवारीपर्यंत मासेमारीला केली बंदी

Order of ONGC, Sowing of the boat due to cesemic survey | सेस्मिक सर्व्हेमुळे बोटी नांगरल्या, ओएनजीसीचे आदेश

सेस्मिक सर्व्हेमुळे बोटी नांगरल्या, ओएनजीसीचे आदेश

googlenewsNext

पारोळ : वसई आणि आसपासच्या समुद्रात तब्बल दीड महिना मासेमारी वर मर्यादा येणार आहे. तेल आणि वायूचा साठा शोधण्यासाठी ओएनजीसीने या वर्षीही वसईच्या समुद्रात सेस्मिक सर्वेक्षण सुरु केलं आहे. त्यामुळे या दरम्यानच्या काळात संपूर्ण मासेमारी बंद राहणार आहे. त्यामुळे बाजारात माशांची आवक घटणार आहे.

वसईच्या समुद्रात हे सर्वेक्षण करताना पाण्यात ब्लास्टसुद्धा करण्यात येणार आहे. त्यामुळे माशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. दररोज मासे विकत घेणाऱ्या खवय्यांनी गजबजणाºया पाचूबंदर मासळी बाजरात सध्या शुकशुकाट पसरला आहे. मच्छीमारांच्या या बोटी किनाºयावर विसावा खात आहेत. पुढील दीड महिना या बाजारात असाच शुकशुकाट पाहायला मिळणार आहे. पण मच्छीमारांना याची कोणतीही भरपाई मिळणार नाही हे विशेष. ओएनजीसीच्या या मोहिमेला १ जानेवारीपासून सुरु वात झाली आहे. ओएनजीसीचं हे सर्वेक्षण २५ फेब्रुवारी २०१९ पर्यंत चालणार आहे. सर्वेक्षण मोहिमेत समुद्रात फिरतीवर असलेल्या या जहाजाला अचानक वळण घेता येत नसल्याने मच्छिमारांनी आपल्या बोटी आणि जाळ्यांना या जहाजाच्या मार्गिकेत न आणण्याची सूचना मच्छीमार बांधवांना केली आहे. तसेच मच्छीमार बांधवांनी आपली मासेमारी थांबवावी अशा सक्त ताकीदही एका परिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या मच्छीमारविरुद्ध धोरणामुळे आधीच किनारपट्टीवरचा मच्छीमार संतप्त झालेला असताना या संतापात ओएनजीसीने आता तेलच ओतले आहे. वसई पाठोपाठ पालघर, बोईसर, तारापुर, बडापोखरन आदी गावातील मच्छीमार कुटुंबांसमोर उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न उभा राहिला आहे. या बंदी काळात मच्छीमार बांधवांचे कोट्यवधींचे नुकसान कोण भरुन देणार असा सवाल विचारला जात आहे.

मच्छीमारांना वायरलेसवरून संदेश

पोलर मर्क्युस या महाकाय जहाजाद्वारे शेअर वॉटर या कंपनी कडून बी ६६ परिसरात ५ नॉटिकल माइल्स वेगाच्या गतीने २४ तास समुद्रातील तळभागात तेल शोध सर्वेक्षणाला सुरु वात करण्यात आलेली आहे. हे सर्वेक्षण दिवसात २४ तास कार्यरत राहणार असून या जहाजाच्या मागे ६ हजार मीटर्स लांबीच्या ८ ते १० लोखंडी केबल्स समुद्रातील तेलाच्या साठ्यांचा खोलवर शोध घेणार आहेत. या केबल्स जहाजाच्या पुढे ७ मीटर्स तर मागे ३० मीटर्स पाण्याखाली असणार आहेत.

पोलर मर्क्युस या जहाजाच्या पाठीमागे असणाºया ६ हजार मीटर लांबीच्या केबल्स ना लाईट असणाºया टेलबोय लावण्यात आली असून हे जहाज निरंतर चालत राहणार असल्याने व ह्या जहाजाला अचानक वळण घेता येत नसल्याने मच्छीमारांनी आपल्या बोटी आणि जाळ्याना या जहाजाच्या मार्गिकेत न आणण्याचा सज्जड दम वजा सूचना परिपत्रके ओएनजीसी द्वारे दिली आहे. त्यामुळे मच्छीमारांनी आपली मासेमारी थांबवावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या महाकाय जहाजाच्या मार्गिकेत कोणी मच्छीमार येऊ नये म्हणून एक सहाय्यक जहाज, आणि २५ ते ३० गार्ड बोट बंदोबस्ताला ठेवण्यात आल्या आहेत. या सहाय्यक बोटीवर काही स्थानिक मच्छीमारांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या मार्फत वायरलेस सेटद्वारे सूचना देऊन मासेमारी करणाºया मच्छीमाराना या जहाजाच्या मार्गातून हुसकावून लावण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या सर्वेक्षणामुळे ५६ दिवस मच्छीमाराना मासेमारी पासून वंचित रहावे लागणार आहे.

समुद्रात ओएनजीसीचे असलेले शेकडो प्लॅटफॉर्म, वसई, उत्तन, मढ येथील काही मच्छीमारांनी केलेले कवींचे अतिक्र मण ह्यामुळे आधीच मासेमारी क्षेत्र कमी पडत असताना ह्या सर्वेक्षणामुळे आमची आर्थिक कोंडी होणार आहे.
- विश्वास पाटील,
क्रि याशील मच्छिमार. सातपाटी

ओएनजीसी सर्वेक्षणामुळे होणाºया नुकसानीची भरपाई आम्हाला मागणी करूनही दिली जात नाही.नेहमी आमची फसवणूक केली जाते.
- रवींद्र म्हात्रे, मच्छीमार,सातपाटी
 

Web Title: Order of ONGC, Sowing of the boat due to cesemic survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.