मॅनहोलच्या जाळ्यांची खात्री करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 03:24 AM2018-06-04T03:24:07+5:302018-06-04T03:24:07+5:30

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील रेल्वे स्थानकांजवळील परिसर, मंडई, चित्रपट/नाट्यगृहे इत्यादी सर्व वर्दळीची ठिकाणे आणि पाणी साचण्याच्या संभाव्य ठिकाणांपैकी ज्या ठिकाणी मॅनहोलच्या झाकणांखाली जाळ्या लावण्याचे ठरले होते, त्या ठिकाणी जाळ्या बसविण्यात आल्याची खात्री करून घेण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

 Order to ensure manhole network | मॅनहोलच्या जाळ्यांची खात्री करण्याचे आदेश

मॅनहोलच्या जाळ्यांची खात्री करण्याचे आदेश

Next

मुंबई : बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील रेल्वे स्थानकांजवळील परिसर, मंडई, चित्रपट/नाट्यगृहे इत्यादी सर्व वर्दळीची ठिकाणे आणि पाणी साचण्याच्या संभाव्य ठिकाणांपैकी ज्या ठिकाणी मॅनहोलच्या झाकणांखाली जाळ्या लावण्याचे ठरले होते, त्या ठिकाणी जाळ्या बसविण्यात आल्याची खात्री करून घेण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मॅनहोलच्या जाळ्या या केवळ शहर भागात नाही; तर पूर्व व पश्चिम उपनगरांमध्ये देखील आवश्यकतेनुसार व गरजेनुरूप बसवायचे आदेश यापूर्वीच देण्यात आले होते. परिमंडळीय उपायुक्तांनी व विभागस्तरीय सहायक आयुक्तांनी पर्जन्यजलवाहिन्या खात्याच्या मदतीने जाळ्या बसविण्याची कार्यवाही करवून घ्यावी. त्याचबरोबर याविषयीचा प्राधान्यक्रम हा परिमंडळीय उपायुक्तांनी निश्चित करावा, असेही आदेश यापूर्वी देण्यात आले होते. याबाबतची कार्यवाही झाली असल्याची खातरजमा पुन्हा एकदा करून घ्यावी, असे आदेश परिमंडळीय उपायुक्तांना व संबंधित विभागाच्या सहायक आयुक्तांना देण्यात आले.
दरम्यान, चौपाट्यांवर पावसाळ्यात आवश्यक ती सुरक्षितता घेण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. जीवरक्षक उपाययोजनांचा भाग म्हणून महापालिका क्षेत्रातील सर्व चौपाट्यांवर ध्वनिक्षेपण यंत्रणा (पब्लिक अडेÑस सिस्टीम) बसविण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, असे आदेश संबंधित विभागांना आयुक्तांनी दिले आहेत.

Web Title:  Order to ensure manhole network

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.