मंत्रालयातील आत्महत्या रोखण्यासाठी समांतर संरक्षक जाळीचा पर्याय  

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, February 10, 2018 1:55am

मंत्रालय आणि परिसरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणा-यांच्या वाढत्या संख्येमुळे, गृहविभाग आणि मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी सांभाळणा-या अधिका-यांची चिंता वाढली आहे. आत्महत्येचे हे प्रयत्न रोखण्यासाठी मंत्रालयाच्या पहिल्या मजल्याला समांतर संरक्षक जाळी बसविण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू आहे.

मुंबई : मंत्रालय आणि परिसरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणा-यांच्या वाढत्या संख्येमुळे, गृहविभाग आणि मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी सांभाळणा-या अधिका-यांची चिंता वाढली आहे. आत्महत्येचे हे प्रयत्न रोखण्यासाठी मंत्रालयाच्या पहिल्या मजल्याला समांतर संरक्षक जाळी बसविण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू आहे. हर्षल रावते या तरुणाने गुरुवारी मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी गृहविभागातील वरिष्ठ अधिकारी आणि मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी असणाºया अधिकाºयांची बैठक झाली. मंत्रालयातील आत्महत्या रोखण्याबाबत तसेच त्रिमूर्ती प्रांगण, अनेक्स इमारतीच्या पहिल्या मजल्याला समांतर संरक्षक जाळी बसविण्याबाबतही चर्चा झाली. मंत्रालय प्रवेशासाठी पुन्हा बारकोड पासची व्यवस्था करावी यावरही यावेळी चर्चा झाली. मात्र, सरकारी कार्यालयात नागरिकांना दिलेल्या वेळेतील प्रवेश प्रतिबंधित करता येत नाही. शिवाय, मंत्रालयात एकाच टेबलवर नागरिकांचा प्रश्न संपेल, याची खात्री नसते. त्यामुळे बारकोड आणि ठरावीक प्रवेशाचा विषय निकाली काढण्यात आला.

संबंधित

प्रदूषणामुळे जीवसृष्टी धोक्यात
जागेअभावी बांधणार ‘दुमजली’ शौचालये
 ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर सादर झालेल्या कथुलीला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
गेली दहा सत्र सुरु असलेल्या ठाण्यातील आगरी शालेचा अखेर समारोप
औरंगाबादच्या आरोपीला मुंबईत अटक

मुंबई कडून आणखी

रस्ता ठेकेदारांना ३४ लाखांचा दंड
‘फोनकॉल’मुळे वाहनचोर गजाआड
लग्नाच्या पहिल्या रात्रीच सौदा करून पती पसार; कुंटणखान्यातून सुटका
चार महिन्यांत चार डीजी होणार निवृत्त
निकम यांना दिवसाला ५० हजार फी

आणखी वाचा