मुंबई - नोटाबंदीविरोधातल्या आंदोलनात विरोधी पक्षांसह सत्ताधारी शिवसेनेनेही सहभाग घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सकाळी आझाद मैदानात नोटाबंदीचे श्राद्ध घालून मुंडण आंदोलन केले होते. त्यानंतर डाव्या पक्षांसह विचारवंत व सामाजिक कार्यकर्त्यांनीही आझाद मैदानात जोरदार निदर्शने केली. काळा पैसा विरोधी दिन साजरा करणाऱ्या भारतीय जनता पार्टीविरोधात सर्वच विरोधकांनी नोटाबंदीवरून टीकेची झोड उठवल्याचे चित्र आझाद मैदानात पाहायला मिळाले. यावेळी खासदार राजू शेट्टी, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, उल्का महाजन, माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर उपस्थित होते.