डायनोसॉरचे अवशेष पाहण्याची संधी; छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाची पर्वणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 04:22 AM2019-05-18T04:22:29+5:302019-05-18T04:22:44+5:30

आंतरराष्ट्रीय संग्रहालयाच्या निमित्ताने कुलाबा येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने बच्चेकंपनी, पर्यटक व अभ्यासकांसाठी डायनोसॉरचे पर्व भेटीस आणले आहे.

Opportunity to see the residue of the dinosaur; Chhatrapati Shivaji Maharaj Museum of Mountaineering | डायनोसॉरचे अवशेष पाहण्याची संधी; छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाची पर्वणी

डायनोसॉरचे अवशेष पाहण्याची संधी; छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाची पर्वणी

Next

मुंबई : महाकाय प्राणी समजल्या जाणाऱ्या डायनोसॉरचे युग हे सामान्यांसाठी कुतूहलाचा विषय आहे. लहानग्यांना तर केवळ हॉलीवूडपटात दिसणारे डायनोसॉरचे पर्व आता खरेखुरे उलगडणार आहे. आंतरराष्ट्रीय संग्रहालयाच्या निमित्ताने कुलाबा येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने बच्चेकंपनी, पर्यटक व अभ्यासकांसाठी डायनोसॉरचे पर्व भेटीस आणले आहे.
जगभरातील वैज्ञानिकांच्या संशोधनानुसार, जगभरात डायनोसॉरच्या १३ हून अधिक प्रजातींनी १०० मिलियन वर्षांहून अधिक काळ अधिराज्य गाजविले. गुजरात येथील बलसिनोर
ठिकाणी डायनोसॉरचे जीवाश्म, अंडी, सांगाडे यांचे अवशेष
सापडले, यातून हे ठिकाण इंडिया ज्युरासिक पार्क नावाने प्रसिद्ध झाले.
या ठिकाणी सापडलेले डायनोसॉरचे अंडे आणि हाडे आंतरराष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने संग्रहालयात ठेवण्यात येणार
आहेत.

रविवारी सहा बालचित्रपटांचे आयोजन

- डायनोसॉरच्या विश्वाविषयी लहानग्यांप्रमाणेच मोठ्यांच्या मनात कायमच कुतूहल आणि कमालीची उत्सुकता दिसून येते. त्यामुळे संग्रहालयाने या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाची संकल्पना समोर आणली आहे. जेणेकरून, केवळ चित्रपट वा कार्टून्सपुरते मर्यादित असणारे हे विश्व लहानग्यांना जाणून घेण्यास मदत होईल.
- संग्रहालयाच्या वेळेत हे पाहण्याची संधी सर्वांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे, संग्रहालयात चिल्ड्रन फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी चार ते पाच या वेळेत सहा बालचित्रपट पाहण्याची संधी लहानग्यांना मिळणार आहे.

Web Title: Opportunity to see the residue of the dinosaur; Chhatrapati Shivaji Maharaj Museum of Mountaineering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई