लघुकालीन तत्वावर पवन ऊर्जा खरेदीसाठी महावितरणतर्फे ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 07:31 PM2018-01-19T19:31:03+5:302018-01-19T19:31:20+5:30

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणकंपनीने राज्यात नुतन वनवीकरणीय ऊर्जेला कायमप्रोत्साहन दिलेले आहे.तसेच आवश्यक असलेली वीज खरेदीस्वस्त दरात करुन ती ग्राहकांनाउपलब्ध करुन दिली आहे. महाराष्ट्रवीज नियामक आयोगाने ठरवूनदिलेल्या नुतनशील वीज खरेदी बंधन(RPO) पूर्ण करण्यासाठी महावितरण लघुकालिन पवनवीज खरेदी करीत आहे.

Online application for the purchase of wind power on short term basis through MSEDCL | लघुकालीन तत्वावर पवन ऊर्जा खरेदीसाठी महावितरणतर्फे ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा 

लघुकालीन तत्वावर पवन ऊर्जा खरेदीसाठी महावितरणतर्फे ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा 

googlenewsNext

 मुंबई  - महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणकंपनीने राज्यात नुतन वनवीकरणीय ऊर्जेला कायमप्रोत्साहन दिलेले आहे.   तसेच आवश्यक असलेली वीज खरेदीस्वस्त दरात करुन ती ग्राहकांनाउपलब्ध करुन दिली आहे. महाराष्ट्रवीज नियामक आयोगाने ठरवूनदिलेल्या नुतनशील वीज खरेदी बंधन(RPO) पूर्ण करण्यासाठी महावितरण लघुकालिन पवनवीज खरेदी करीत आहे.

राज्यातील ज्या जुन्या पवनऊर्जा प्रकल्पांचे दीर्घकालिन वीजखरेदी करार संपुष्टात आलेआहेत,  अथवा जे प्रकल्प सध्याकोणत्याही वीजग्राहकांना वीजविकत नाहीत. अशा प्रकल्पांची वीजलघुकालीन तत्वावर खरेदीकरण्यासाठी महावितरणने आपल्याwww.mahadiscom.in यासंकेत स्थळावर एक ऑनलाईनलिंक उपलब्ध करुन दिलेली आहे.यामध्ये पवन ऊर्जेचे प्रकल्पधारकआपली वीज विकण्याचा प्रस्तावमहावितरण कंपनीला सादर करुशकतात. ही योजना दि. 01जानेवारी 2018 पासून कार्यान्वितकरण्यात आलेलीे आहे.

 

या योजनेद्वारे कमीत कमी 3महिने तर जास्तीत जास्त एकावर्षापर्यंत महावितरण वीज खरेदीकरणार आहे. तसेच अर्जदारानेकमीत कमी 30 दिवसापूर्वी अर्जकरणे आवश्यक असून दि.27.12.1999 पूर्वीचे कार्यान्वित पवनऊर्जा प्रकल्पाची रु. 2.25 प्रती युनिट वीजदर आणि त्यlनंतरकार्यान्वित झालेल्या पवन ऊर्जाप्रकल्पासाठी रु. 2.52/- प्रती युनिटया दराने वीजखरेदी होणार आहे.महावितरण आणि प्रकल्पधारकयांच्यात वीजखरेदीचा सामंजस्यकरार केल्यानंतर या वीजखरेदीचीसुरुवात होणार आहे. या कालावधीतप्रकल्पधारकांना नुतनशील वीजप्रमाणपत्राचा (REC) लाभ मिळणारनाही, असे महावितरणने स्पष्ट केलेआहे. ऑनलाईन पोर्टलचा वापरकरुन लघुकालीन वीज खरेदीसाठीइच्छूक पवनऊर्जा प्रकल्पांनीमहावितरणकडे अर्ज करावा, असेआवाहन महावितरणने केले आहे.तसेच सौरऊर्जा प्रकल्पधारकांसाठीलवकरच वरील पध्दतीने 2 रुपये 50पैसे प्रतियुनिट या दराने लघुकालीनखरेदीची ऑनलाईन व्यवस्थाकरण्यात येणार आहे.

Web Title: Online application for the purchase of wind power on short term basis through MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.