डिझायनिंग क्षेत्रातील एक पैलू-वॉच डिझायनिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 04:04 AM2018-07-09T04:04:13+5:302018-07-09T04:04:43+5:30

तुम्हाला जर चांगले वॉच डिझायनर व्हायचे असल्यास, त्यासाठी तुमच्या अंगी काही गुण असावेच लागतात. सुरुवातीला निर्मितीक्षमता, एखादा विषय सखोल अभ्यासण्याची आवड, या क्षेत्रातील सर्व माहिती व उपकरणांची जाण असणे, उत्तम निरीक्षण शक्ती, ग्राहकांच्या मनातील आवड ओळखण्याची क्षमता आणि तुम्ही ज्यांच्यासाठी काम करता, त्यांच्याशी कामाबाबतची एकनिष्ठता असावी.

 One aspect-designing in the designing area | डिझायनिंग क्षेत्रातील एक पैलू-वॉच डिझायनिंग

डिझायनिंग क्षेत्रातील एक पैलू-वॉच डिझायनिंग

googlenewsNext

तुम्हाला जर चांगले वॉच डिझायनर व्हायचे असल्यास, त्यासाठी तुमच्या अंगी काही गुण असावेच लागतात. सुरुवातीला निर्मितीक्षमता, एखादा विषय सखोल अभ्यासण्याची आवड, या क्षेत्रातील सर्व माहिती व उपकरणांची जाण असणे, उत्तम निरीक्षण शक्ती, ग्राहकांच्या मनातील आवड ओळखण्याची क्षमता आणि तुम्ही ज्यांच्यासाठी काम करता, त्यांच्याशी कामाबाबतची एकनिष्ठता असावी. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी डिझाइनचे मूलभूत ज्ञान आणि दृष्टीकोन आवश्यक आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ फॅशन डिझाइन, मुंबई, तसेच एमएमआईटी इन्स्टिट्यूट आॅफ डिझाइन, पुणे यासारख्या संस्थांमध्ये वॉच डिझायनिंगचे प्रशिक्षण मिळू शकते.

कल्पकतेला सीमा नसते असे म्हणतात, मग ती कल्पकता आणि त्यातून निर्माण होणारी क्रिएटिव्हिटी आपण कशीही, कुठेही वापरू शकतो. कल्पकतेला वाव देणारे असेच एक डिझायनिंग क्षेत्र म्हणजे वॉच डिझायनिंग. वॉच डिझायनरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. घड्याळ निरीक्षण करणाऱ्या टायटन, सोनाटा, मॅक्झिमा, अजंता या कंपन्यात वॉच डिझायनरची गरज आहे. याशिवाय छोट्या कंपन्यांची भारतीय वॉच मार्केटमध्ये भागीदारी असते. अशा छोट्या कंपन्यांमधूनही करिअरची सुरुवात करता येते. मोबाइल निर्मात्या कंपन्या स्पोटर््स वॉच तयार करण्यासाठी सरसावल्या आहेत. त्यामुळे नोकरीच्या संधी जास्त आहेत.
वॉच डिझायनर होण्यासाठी प्रॉडक्ट्स, इंडस्ट्रियल किंवा अ‍ॅसेसरीज डिझायनिंगचा कोर्स करावा लागतो. त्यासाठी चांगल्या संस्थेची निवड करावी. पदवी स्तरावरील कोर्स करण्यासाठी बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. पीजी डिप्लोमासाठी डिझायनिंग, इंजिनीअरिंग किंवा आर्किटेक्चरची डिग्री असणे आवश्यक आहे. या क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल, तर क्रिएटिव्हीसोबतच तांत्रिक ज्ञान असावे. वेगवेगळ्या प्रकारच्या घडाळ्यासंबंधी माहिती हवी. मार्केट ट्रेंड, तसेच ग्राहकाची आवडनिवड लक्षात घेऊन डिझाइन करावे.
आवडीच्या क्षेत्रात मन लावून काम केले, तर यश फार काळ दूर राहू शकत नाही. आपल्या कलागुणांना सर्वांसमोर ठेवा. डिझायनिंगच्या क्षेत्रात सतत नवनवीन निर्मितीक्षमता खूप महत्त्वाची असते. सध्या वस्तूची परवडण्याजोगी किंमत, तिचा उत्पादन दर्जा या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. जर डिझाइन युनिक नसेल, त्यात वेगळेपणा नसेल, तर त्याकडे कोणीही पाहणार नाही आणि खरेदीही करणार नाही. कारण ग्राहकाला सतत काहीतरी नवीन हवे असते. त्यामुळेच आज घड्याळांसारख्या उत्पादनांमध्ये रोज नवनवीन डिझाइन बाजारात येत आहेत. या डिझाइन्स ग्राहकांच्या भावनांना सकारात्मक स्पर्श करतात.
वॉच डिझाइन हे क्षेत्र लाइफस्टाईल डिझाइनच्या छताखाली येते. समजा, एखाद्या डिझायनरने एखाद्या खेळाडूसाठी खास स्पोर्टी लूकमध्ये घड्याळाची रचना केली असेल, तर ते डिझाइन फक्त त्या खेळाडूपुरतेच मर्यादित न राहता त्याच्या चाहत्यांमध्येही प्रसिद्ध होते, तसेच फॅशन वॉच, यूथफुल वॉच, क्लासिकल वॉच, अल्ट्रा मॉडर्न वॉच अशा अनेक डिझाइनची घड्याळे बाजारात पाहायला मिळतात. हे डिझाइन बनविताना ग्राहकांची मानसिकताही लक्षात घ्यावी लागते, तसेच त्यांना परवडेल अशा किमतीत ते उपलब्ध करावे लागते. डिझाइनबाबत ग्राहक खूप भावनिक असतात. त्यामुळे डिझाइन म्हणजे एखाद्याचे विचार, भावना आणि अनुभव व्यक्त करण्याचे माध्यम मानले जाते, असे या क्षेत्रात कार्यरत व्यक्ती सांगतात.
वॉच डिझायनिंग क्षेत्रात कल्पनांना अंत नाही. प्रत्येक नवीन प्रोजेक्टमधून सतत काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा तुमच्यात असावी लागते. तुमच्या कल्पकतेला यात वाव असल्याने, याच्याइतका कामाचा आनंद देणारे दुसरे चांगले क्षेत्र नाही. अलीकडे घड्याळांच्या निर्मितीमध्ये अनेक नवनवीन कंपन्या येत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रसिद्ध कंपन्या भारतात आपले बस्तान बसविण्याच्या मागे आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील रोजगाराच्या संधीही वाढत आहेत. यामुळे कलेची जाण असणाºयांसाठी या क्षेत्रात उत्तम संधी आहेत. वॉच डिझायनर हा जॉब मुळात क्लिष्ट, पण सतत निर्मितीक्षम असणारा आहे. यामध्ये एखाद्या डिझाइनची कल्पना सुचण्यापासून ते ती कागदावर उतरवून, त्यातील तांत्रिक डिझाईनचा अभ्यास करून ती ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, अशा रीतीने मांडावी लागते. हा जॉब म्हणजे ठरलेल्या नऊ तासांची नोकरी नाही, तर २४ तास पूर्ण वेळ निर्मितीक्षम असण्याची गरज यामध्ये असते.
चांगला डिझायनर होण्यासाठी त्याने सतत नवनवीन डिझाइनचा विचार करायला हवा. कारण कधी एखादी अफलातून कल्पना मनात येऊन त्यातून प्रसिद्ध डिझाइन तयार होईल, ते सांगता येत नाही. या जॉबमध्ये तुमच्या कल्पनांना मोबदलाही चांगला मिळतो. ज्युनिअर डिझायनरला वर्षाला पाच ते सहा लाखांचे पॅकेज मिळते, तर चार-पाच वर्षांचा अनुभव असणाºयाला १० ते १२ लाखांपर्यंत वार्षिक पॅकेज मिळते. तुमच्या मनातील डिझाइनचा तुम्हाला स्वतंत्र ब्रँड तयार करावयाचा असल्यास तुमच्यासमोर क्षितिजच ठेंगणे आहे. यासाठी फक्त उत्तम नेटवर्क आणि ग्राहकांच्या आवडी-निवडीचे उत्तम ज्ञान असणे गरजेचे आहे.

Web Title:  One aspect-designing in the designing area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :newsबातम्या