जुन्या प्रकल्पांच्या पोकळ घोषणा, पालिकेचा नवीन वर्षातील अजेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 07:16 AM2018-01-02T07:16:58+5:302018-01-02T07:17:12+5:30

कमला मिल कंपाउंडमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेमुळे महापालिकेला टीकेचे धनी व्हावे लागत आहे. या घटनेने प्रतिमाच डागाळल्यामुळे महापालिकेचे कर्तृत्व दाखविण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू आहे. यासाठी जुन्याच प्रकल्पांचे नियोजन करीत, नवीन वर्षाचा अजेंडा सोमवारी जाहीर करण्यात आला.

 Old Announcement of Old Projects, Municipal New Year Agenda | जुन्या प्रकल्पांच्या पोकळ घोषणा, पालिकेचा नवीन वर्षातील अजेंडा

जुन्या प्रकल्पांच्या पोकळ घोषणा, पालिकेचा नवीन वर्षातील अजेंडा

Next

मुंबई - कमला मिल कंपाउंडमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेमुळे महापालिकेला टीकेचे धनी व्हावे लागत आहे. या घटनेने प्रतिमाच डागाळल्यामुळे महापालिकेचे कर्तृत्व दाखविण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू आहे. यासाठी जुन्याच प्रकल्पांचे नियोजन करीत, नवीन वर्षाचा अजेंडा सोमवारी जाहीर करण्यात आला. त्यानुसार, सन २०१८ मध्ये मुंबईच्या विकासाचे नियोजन करणारा डीपी, महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्प, मलजल प्रक्रिया केंद्र, कचºयापासून वीजनिर्मिती प्रकल्प, वस्त्रोद्योग संग्रहालय, कफ परेड येथील तीनशे एकराचे हरित उद्यान, दहिसर व अंधेरी परिसरात भव्य क्रीडा संकुल, ७ नवीन जलतरण तलाव, १८ हजार नवीन शौचकूप अशा अनेक प्रकल्पांचा यात समावेश आहे.
दोन वर्षांपूर्वी उघड झालेल्या रस्ते व नालेसफाई घोटाळ्याने महापालिकेच्या प्रतिमेला धक्का दिला. त्यानंतरही वर्षभरात अनेक घटना घडत राहिल्या. मात्र, साकीनाका आणि त्यापाठोपाठ कमला मिल कंपाउंडमधील आगीने महापालिकेतील भ्रष्ट कारभार उघड केला आहे. त्यामुळे पहिल्यांदाच झटपट कारवाई करून, महापालिका प्रशासनाने आपला बचाव केला आहे. जुन्या अनुभवावरून या नवीन वर्षात महापालिका अधिकाºयांना अधिक सावध राहावे लागणार आहे. अशा महत्त्वाच्या सुमारे ४०पेक्षा अधिक प्रकल्पांची यादी तयार करून, सर्व संबंधित अतिरिक्त आयुक्तांना त्यांच्यांशी संबंधित प्रकल्प आणि कार्यांच्या निविदांपासून प्रत्यक्ष अंमलबजावणीचा कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

वर्षभरात हे प्रकल्प पूर्ण होणार

१९९१ च्या मंजूर विकास आराखड्यातील आरक्षणे प्रारूप विकास नियोजन आराखडा २०३४ मध्येही ठेवण्यात आली आहेत. अशा १४० पैकी काही भूखंडांच्या नियोजित विकासाची प्रक्रिया सुरू असून, उर्वरित भूखंडांच्या विकासाची प्रक्रिया या वर्षी सुरू होणार आहे.

३९ किमी. लांबीच्या तानसा जलवाहिनीच्या दुतर्फा सायकल ट्रॅक बांधण्याचे काम तीन टप्प्यांत केले जाणार आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण करून पहिल्या टप्प्याचे फेब्रुवारी २०१८, दुसºया टप्प्याचे मार्च २०१८, तर तिसºया टप्प्याचे काम मे २०१८ मध्ये सुरू होणे अपेक्षित आहे, तसेच सायकल ट्रॅकचे काम येत्या वर्षात पूर्ण होऊन नागरिकांना वापरण्यासाठी उपलब्ध होईल.

हुतात्मा चौकातील फ्लोरा फाउंटन व परिसर, मेट्रो सिनेमाजवळील फिट्झगेराल्ड फाउंटन, ए विभागातील कूपरेज उद्यानतील बँड स्टँड, जीपीओजवळील कोठारी प्याऊ, डी विभागातील भाजेकर हॉस्पिटल, शेठ ए. जे. बी. कान-नाक-घसा रुग्णालय इ. विभागांतील मुफ्तीपोज दवाखाना, बाळाराम स्ट्रीटवरील टी. बी. क्लिनिक इत्यादी महापालिकेच्या ताब्यातील पुरातन इमारतीचे सुशोभीकरण.

भाजीविक्री होणाºया मंडयांमध्ये ओल्या कचºयापासून खत निर्मिती करणारे प्रकल्प उभारणार.
देवनार पशुवधगृहाच्या आधुनिकीकरणासाठी सल्लागाराची नेमणूक करुन निविदा प्रक्रिया
पूर्ण करुन काम सुरु करणे.

मिठी नदीच्या किनाºयाचे सुशोभीकरण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन, मे २०१८ अखेरपर्यंत काम सुरू होणे अपेक्षित आहे.
मुंबईचा ऐतिहासिक ठेवा असणारा वांद्रे किल्ला व वांद्रे तलाव यांचे सुशोभीकरण येत्या वर्षी पूर्ण होईल.
मुंबईतील एकूण पथदिव्यांपैकी २० टक्के पथदिवे हे मार्च २०१८ पर्यंत एलईडीने बदलण्यात येतील, तर उर्वरित दिवे लवकरच बदलण्यात येतील.
लाल बहादूर शास्त्री मार्ग व स्वामी विवेकानंद मार्ग यांच्या रुंदीकरणाचे काम येत्या वर्षी सुरू होऊन पूर्ण होईल.
सर्व इमारती, आस्थापना, रस्ते, पदपथ इत्यादींचे ३६० अंशातील लिडार सर्वेक्षण सध्या सुरू आहे. हे सर्वेक्षण या वर्षी पूर्ण होईल.
१८ हजार शौचकुपे असणाºया सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम.

अग्निसुरक्षाविषयक अंमलबजावणीसाठी
३४ अग्निसुरक्षा कक्ष
पाच मंड्यांचे पारंपरिक पद्धतीने सुशोभीकरण, सी विभागातील मिर्जा गालिब मंडई, डी विभागातील लोकमान्य टिळक मंडई, जी उत्तर विभागातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडई, गोपी टँक मंडई, क्रांतिसिंह नाना पाटील मंडई यांचा समावेश.

च्झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाकडून महापालिकाला हस्तांतरित होणाºया इमारतीत प्रशिक्षण केंद्र सुरू करणार.
च्मलबार हिल परिसरात व्ह्युविंग गॅलरी.
च्सर्व मालमत्तांना युनिक आयडेंटिफिकेशन नंबर देण्याचे काम पूर्ण होणार.
च्डिजिटल शाळांचा व डिजिटल वर्गखोल्यांचा विकास. शाळांमध्ये ध्वनिक्षेपण यंत्रणा बसविणे.
च्माहिम चौपाटी व माहिती कॉजवेचे सुशोभीकरण.
च्नगर पथविक्रेता समितींची स्थापना करणे.
च्संत गाडगेबाबा चौकाचे (सात रस्ता) सुशोभीकरण.
च्महापालिकेच्या रुग्णालये व दवाखान्यांमध्ये येणाºया रुग्णांची माहिती संगणकीय पद्धतीने जतन करण्याच्या दृष्टीने हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सीस्टिम कार्यान्वित करणे.

कामाला सुरुवात
होणारे प्रकल्प
सागरी किनारा रस्ता (कोस्टल रोड) हा महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. शामलदास गांधी मार्गाच्या उड्डाणपुलापासून वरळी-वांद्रे सागरी सेतूपर्यंतच्या ९.९८ किलोमीटर लांबीचा सागरी किनारा रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. या रस्त्याच्या कामास एप्रिल २०१८ मध्ये सुरुवात होईल.

च्दहीसर परिसरातील भावदेवी मैदान आणि अंधेरी परिसरातील वीरादेसाई मार्ग या दोन ठिकाणी क्रीडा संकुल उभारणार.
च्वरळी, गोवंडी, भांडुप, दहिसर या ठिकाणी प्रत्येकी १ तर अंधेरीमध्ये २ नव्या तरण तलावांची निर्मिती करणार.
च्राजीव गांधी सागरी सेतू (वरळी वांद्रे सी लिंक) ते रंग शारदा मार्ग यांच्यात थेट संपर्क रस्ता तयार करणार.
च्एच पश्चिम व इ विभागात भूमिगत वाहनतळ सुविधा.
च्वस्त्रोद्योग संग्रहालय उभारण्याची कार्यवाही.

Web Title:  Old Announcement of Old Projects, Municipal New Year Agenda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.