ओला-उबर टॅक्सी चालक पुन्हा संपावर, सरकारसमोर १३ मागण्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 06:11 AM2018-11-18T06:11:39+5:302018-11-18T06:12:19+5:30

सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने ओला, उबर चालकांनी पुन्हा संपावर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील तीस हजार ओला, उबर टॅक्सी चालक मालक शनिवारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत.

Ola-Uber taxi driver strikes again | ओला-उबर टॅक्सी चालक पुन्हा संपावर, सरकारसमोर १३ मागण्या

ओला-उबर टॅक्सी चालक पुन्हा संपावर, सरकारसमोर १३ मागण्या

Next

मुंबई : सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने ओला, उबर चालकांनी पुन्हा संपावर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील तीस हजार ओला, उबर टॅक्सी चालक मालक शनिवारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत.
मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील ३० हजार अ‍ॅप आधारित टॅक्सीचालक-मालकांनी प्रलंबित मागण्यांसाठी १२ दिवस संप पुकारला. सरकारसमोर १३ मागण्या मांडल्या. संप मिटण्यासाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी बैठक बोलावली. १५ नोव्हेंबरपर्यंत ओला, उबर टॅक्सीचालक-मालकांच्या संपावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने संप मागे घेण्यात आला. मात्र, १७ नोव्हेंबर उजाडला, तरी सरकारने मार्ग न काढल्याने पुन्हा संप करण्याात येईल. सोमवारी सकाळी १० वाजता लालबाग भारतमाता सिनेमाजवळून विधानभवनावर आक्रोश मोर्चा निघेल. एसी हॅचबॅक कॅबसाठी प्रतिकिमी १६ रुपये, एसी सेदान कॅबसाठी प्रतिकिमी १८ रुपये, तर एसी एसयूव्ही कारसाठी पहिल्या चार किमीसाठी किमान १०० ते १५० रुपये भाडेदर निश्चित ठेवावे, या मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला आहे.

Web Title: Ola-Uber taxi driver strikes again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :OlaUberओलाउबर