आता रत्नागिरी उपकेंद्रातही मिळणार शैक्षणिक सुविधा, मुंबई विद्यापीठाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 07:03 AM2018-04-07T07:03:10+5:302018-04-07T07:03:10+5:30

रत्नागिरी उपकेंद्राचे सक्षमीकरण करून, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संलग्नीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सोईसुविधा, आता रत्नागिरी उपकेंद्रात उपलब्ध करून देण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे.

Now the educational facility of the Ratnagiri sub-center, the University of Mumbai's decision | आता रत्नागिरी उपकेंद्रातही मिळणार शैक्षणिक सुविधा, मुंबई विद्यापीठाचा निर्णय

आता रत्नागिरी उपकेंद्रातही मिळणार शैक्षणिक सुविधा, मुंबई विद्यापीठाचा निर्णय

Next

मुंबई - रत्नागिरी उपकेंद्राचे सक्षमीकरण करून, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संलग्नीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सोईसुविधा, आता रत्नागिरी उपकेंद्रात उपलब्ध करून देण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. दोन जिल्ह्यांतील जवळपास ९६ संलग्नित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा रत्नागिरी उपकेंद्रामध्ये पुरविल्या जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता शैक्षणिक कामांसाठी मुंबईत यावे लागणार नाही.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तळेरे येथील आदर्श महाविद्यालयात ४ एप्रिल २०१८ रोजी झालेल्या सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत ठरल्यानुसार, यापुढे येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना परीक्षा विभागाशी संबंधित परीक्षा अर्ज, पुनर्मूल्यांकन अर्ज, गुणपत्रक दुरुस्ती आणि पदवी प्रमाणपत्र दुरुस्ती अर्जांची कामे आता रत्नागिरी उपकेंद्रामध्ये करता येतील. त्याचबरोबर, पात्रता व नोंदणी स्थलांतर अर्जाची कामे, दूर व मुक्त अध्ययन संस्थेशी संबंधित स्थानांतरण प्रमाणपत्राचे कामही याच उपकेंद्रात केली जाणार आहेत.
पदव्युत्तर नोंदणी, परीक्षा विभागाशी संबंधित विविध देयकांबाबतची सुविधा रत्नागिरी उपकेंद्रात मिळणार आहे. शिक्षकांच्या पदोन्नतीच्या कामांकरिता, विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांमार्फत ठरावीक दिवस रत्नागरी उपकेंद्रांत शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे.
परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी दूर व मुक्त अध्ययन संस्थेचे प्रतिनिधी रत्नागिरी उपकेंद्रात हजर राहणार आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयांकरिता नॅक मूल्यांकन पद्धतीसाठी कार्यशाळांचे आयोजनही या उपकेंद्रात केले जाणार आहे.

उपकेंद्रामध्ये मिळणार या सुविधा
च्परीक्षा अर्ज, पुनर्मूल्यांकन अर्ज, गुणपत्रक दुरुस्ती आणि पदवी प्रमाणपत्र दुरुस्ती अर्जांची कामे
च्पात्रता व नोंदणी स्थलांतर अर्जाची कामे, दूर व मुक्त अध्ययन संस्थेशी संबंधित स्थानांतरण प्रमाणपत्राची कामे
च्पदव्युत्तर नोंदणी, परीक्षा विभागाशी संबंधित विविध देयकांबाबतची सुविधा
च्शिक्षकांची पदोन्नतीची कामे
च्परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दूर व मुक्त अध्ययन केंद्राच्या प्रतिनिधींची हजेरी
च्महाविद्यालयांच्या नॅक मूल्यांकनासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन
 

Web Title: Now the educational facility of the Ratnagiri sub-center, the University of Mumbai's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.