सांडपाण्यावर भाजीपाला पिकविणाऱ्यांवर कठोर कारवाईच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:54 AM2019-06-20T00:54:42+5:302019-06-20T00:54:50+5:30

राज्यमंत्री मदन येरावार यांची विधानसभेत माहिती

Notice of strict action against the cultivators on the sewage | सांडपाण्यावर भाजीपाला पिकविणाऱ्यांवर कठोर कारवाईच्या सूचना

सांडपाण्यावर भाजीपाला पिकविणाऱ्यांवर कठोर कारवाईच्या सूचना

googlenewsNext

मुंबई: डोंबिवली एमआयडीसीमधील कंपन्यांमधून सोडण्यात येणा-या सांडपाण्यावर भाजीपाला पिकवणा-यांवर कारवाई करण्याबाबत स्थानिक प्राधिकरण, कल्याण डोंबिवली महानगर पालिका व मध्य रेल्वे तसेच कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील अधिका-यांना कळवण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी बुधवारी विधानसभेत दिली.

मुंबईत उघड्यावर विक्री केल्या जाणारे लिंबू सरबत व उसाच्या रसासाठी वापरले जाणा-या दूषित पाण्याबाबत अमित देशमुख यांनी लक्षवेधी मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेत अजित पवार, जयकुमार रावल, संजय केळकर आदींनी भाग घेतला. सध्या कॅन्सरचे प्रमाण वाढत चालले आहे. दूषित भाज्या, फळे, अन्नपदार्थ याला कारणीभूत आहेत. अशा दूषित आणि घातक भाज्या, फळे यांची विक्री करणा-यांना जन्मठेप होईल असा कठोर कायदा करण्यात यावा अशी मागणी अजित पवार यांनी केली. या चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री मदन येरावार म्हणाले की, रेल्वे रुळांच्या लगत पिकवण्यात येणा-या भाजीपाल्याच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालया याचिका दाखल झाली होती. रेल्वेच्या जागेमध्ये भाजीपाला पिकवणा-यांकडून उल्लंघन होणार नाही याची खात्री करण्याचे आदेश रेल्वेला दिले आहेत. न्यायालयाच्या अटी व शर्तींचे उल्लंघन करणा-यांचे परवाने रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

रेल्वेच्या जमिनीवर फुलशेती करा
रेल्वेच्या जमिनीवर पिकविण्यात येणा-या भाज्यांवरून वाद होतो. त्या जागेवर भाज्यांऐवजी फुलांची शेती करण्यात यावी, अशी सूचना भाजपाच्या संजय केळकर यांनी या वेळी केली.

एक लाख किलो बर्फ नष्ट
एक एप्रिल ते १६ मे २०१९ या काळात मुंबईतील ८ हजार ०१२ फेरीवाल्यांवर कारवाई करून २१ हजार ४६३ किलो उघड्यावरील खाद्यपदार्थ जप्त केले. ३६ हजार ०५४ लिटर सरबत व १ लाख १६ हजार ७२३ किलो बर्फ जप्त करून नष्ट केला.
मुंबई पालिकेने उघड्यावर विक्री केल्या जाणाºया लिंबू सरबतासाठी वापरण्यात येणाºया पाणी व बर्फाचे नमूने घेतले असून २८०पैकी २१८ नमूने दूषित आढळल्याची माहिती मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

Web Title: Notice of strict action against the cultivators on the sewage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :localलोकल