यंदा बेस्टची भाडेवाढ नाही!; आर्थिक तूट ७२० कोटींवर, भांडवली खर्चासाठी ४५२.३४ कोटींची तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 05:59 AM2018-10-09T05:59:27+5:302018-10-09T05:59:41+5:30

गेल्या वर्षभरात काटकसर व बचतीचे अनेक उपाय करूनही आर्थिक तूट कमी करण्यात बेस्ट उपक्रमाला यश आलेले नाही. याउलट सन २०१९-२० या आर्थिक वर्षातही वाहतूक विभाग तुटीत असल्याने तब्बल ७२० कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प प्रशासनाने बेस्ट समितीकडे सोमवारी सादर केला.

Not the best fares this year! A budget deficit of Rs. 720 crore, provision of Rs. 452.34 crore for capital expenditure | यंदा बेस्टची भाडेवाढ नाही!; आर्थिक तूट ७२० कोटींवर, भांडवली खर्चासाठी ४५२.३४ कोटींची तरतूद

यंदा बेस्टची भाडेवाढ नाही!; आर्थिक तूट ७२० कोटींवर, भांडवली खर्चासाठी ४५२.३४ कोटींची तरतूद

Next

मुंबई : गेल्या वर्षभरात काटकसर व बचतीचे अनेक उपाय करूनही आर्थिक तूट कमी करण्यात बेस्ट उपक्रमाला यश आलेले नाही. याउलट सन २०१९-२० या आर्थिक वर्षातही वाहतूक विभाग तुटीत असल्याने तब्बल ७२० कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प प्रशासनाने बेस्ट समितीकडे सोमवारी सादर केला. मात्र, तूट वाढली तरी आगामी आर्थिक वर्षात बेस्ट प्रवाशांवर भाडेवाढीचा भार टाकण्यात आलेला नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पाने मुंबईकरांना ‘बेस्ट’ दिलासा दिला आहे.
सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात बेस्ट प्रशासनाने सादर केलेला तुटीचा अर्थसंकल्प अद्याप महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी मंजूर केला नाही. आर्थिक संकटातून बाहेर पाडण्यासाठी बेस्ट उपक्रमाला काटकसरीच्या उपाययोजना करण्याची शिफारस महापालिकेने केली होती.
मात्र, काही शिफारशींना कामगार संघटनांचा विरोध तर काही निर्णयांना आव्हान देण्यात आल्याने बेस्ट उपक्रमाचे बचतीचे प्रयत्न फोल
ठरले. त्यामुळे पुन्हा एकदा
तुटीचा अर्थसंकल्प बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांना बेस्ट भवन येथे सोमवारी सायंकाळी सादर केला.
मात्र, बेस्ट उपक्रमाच्या तिजोरीत खडखडाट असल्याने कोणत्याही नवीन योजना, सुविधा अथवा प्रवासात
सूट जाहीर करण्यात आलेली
नाही.
आगामी वर्षातील भांडवली खर्चासाठी ४५२.३४ कोटी एवढ्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात उपक्रमाचे विद्युत
आणि वाहतूक विभागाचे आधुनिकीकरण व संगणकीकरणावर भर देण्यात आला आहे. परंतु, बस तिकीट, मासिक पास आदीमध्ये कोणतीही नवीन भाडेवाढ आगामी अर्थसंकल्पात प्रस्तावित नाही, असे महाव्यवस्थापकांनी स्पष्ट केले.

ताफ्यात ७१३ नवीन बस
आयुर्मान संपल्यामुळे बाद झालेल्या गाड्यांची संख्या कमी झाली आहे. त्याचा परिणाम बस फेऱ्यांवर होत आहे. त्यामुळे ३१ मार्च २०२० पर्यंत बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात ७१३ नवीन बसगाड्या दाखल करण्याचे लक्ष्य बेस्ट प्रशासनाने ठेवले आहे. सध्या बेस्टच्या ताफ्यात ३३३७ बसगाड्या आहेत. पुढील वर्षभरात यात नवीन बसगाड्यांची भर पडल्यानंतर बेस्टचा ताफा ४०५० वर पोहोचणार आहे. भाडे करारावर घेण्यात येणाºया बसगाड्यांमुळे हा ताफा वाढणार आहे.

सानुग्रह अनुदानाची तरतूद नाही
अर्थसंकल्पात बेस्ट कर्मचाºयांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. आर्थिक संकटामुळे कामगारांचे दर महिन्याचे वेतन देणे बेस्ट प्रशासनाला अवघड जात आहे. त्यामुळे दिवाळीनिमित्त देण्यात येणाºया सानुग्रह अनुदानाबाबतही कोणतेच भाष्य या अर्थसंकल्पात करण्यात आलेले नाही.

अर्थसंकल्पाचे भवितव्य अंधारात
२०१७-१८ या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्प बेस्ट उपक्रमाने एक लाख शिलकीत दाखवल्यानंतर महापालिकेने मंजूर केला होता. मात्र २०१८-१९ या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्प अद्याप महापालिकेच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. हा अर्थसंकल्प बेस्ट उपक्रमाने ८८० कोटी रुपये तुटीचा सादर केला होता. तो महापालिकेने फेटाळला आहे. सुधारित अर्थसंकल्प ६८९ कोटी रुपयांचा आहे. हा अर्थसंकल्प मंजूर होईपर्यंत २०१९-२० च्या अर्थसंकल्पाचे भवितव्य अंधारात आहे.

अशा आहेत सुविधा...
पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीमद्वारे बसमधून प्रवास करणाºया प्रवाशांना बसचे स्थळ तसेच येणाºया बसथांब्याची माहिती उद्घोषणेद्वारे मिळणार आहे. बसगाड्यांची आणि बसमार्गांची माहिती अचूक वेळेसह बस प्रवाशांना उपलब्ध होणार आहे.
राज्य शासन लवकरच एकच प्रवास कार्ड (कॉमन मोबिलिटी कार्ड) अंतर्गत रेल्वे, बेस्ट, मेट्रो, मोनो व इतर सार्वजनिक वाहतूक प्राधिकरणे यामधून प्रवासाकरिता
एकच प्रवास कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे बेस्टचे तिकीट क्रेडिट, डेबिट, स्वाइप सुविधा, मोबाइल तिकीट, आॅनलाइन व्यवहार, वायफाय तंत्रज्ञान आधी सुविधा प्रवाशांना देण्यात येणार आहेत.
प्रवाशांच्या माहितीसाठी मोबाइल अ‍ॅप विकसित करण्यात येत आहे. त्यामुळे किती वीज वापरली हेदेखील ग्राहकांना कळणार आहे.

Web Title: Not the best fares this year! A budget deficit of Rs. 720 crore, provision of Rs. 452.34 crore for capital expenditure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.