गेममुळे नाही, अभ्यासाला कंटाळून सोडले घर, नेपाळ सीमेवरून ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, November 11, 2017 6:37am

गेमच्या नादात घर सोडलेल्या गोवंडीतील मुलाच्या वृत्ताने सर्व तपास यंत्रणा कामाला लागल्या. मात्र गेममुळे नाही, तर अभ्यासाला कंटाळून त्याने घर सोडल्याची धक्कादायक माहिती मुलाच्या चौकशीतून उघड झाली आहे

मुंबई : गेमच्या नादात घर सोडलेल्या गोवंडीतील मुलाच्या वृत्ताने सर्व तपास यंत्रणा कामाला लागल्या. मात्र गेममुळे नाही, तर अभ्यासाला कंटाळून त्याने घर सोडल्याची धक्कादायक माहिती मुलाच्या चौकशीतून उघड झाली आहे. त्याला नेपाळच्या सीमेवरून गुन्हे शाखेने शुक्रवारी ताब्यात घेतले आहे. ‘मी चूक करतोय, पण मला शोधण्याचा प्रयत्न करू नका, माझा मृत्यू झालाय असे समजा, अशा आशयाची चिठ्ठी लिहून २९ आॅक्टोबरपासून घर सोडलेल्या गोवंडीतील मुलाने सर्वांचीच झोप उडविली. त्याचे वडील वृत्तवाहिनीवर उच्च पदावर आहेत. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला. आॅनलाइन गेमची आवड असलेल्या या विद्यार्थ्याचा लॅपटॉप पोलिसांनी तपासला तेव्हा डार्क नेटवरून डाऊनलोड केलेला सॅड सॅटन गेम तो खेळत असल्याचे आढळले. या गेममध्ये तीन टप्पे असून तिसरा टप्पा जिवावर बेतणारा ठरू शकतो, अशी माहिती पुढे आल्याने पोलीसही चक्रावले. गुन्हे शाखेसह राज्य दहशतवादविरोधी पथकही कामाला लागले. शोध सुरू असताना तीन दिवसांपूर्वी या मुलाने त्याच्या मैत्रिणीला फोन केला. त्या फोनची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. तेव्हा तो नेपाळ सीमेवर असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तत्काळ नेपाळ गाठले आणि मुलाला ताब्यात घेतले. मुलाकडे केलेल्या चौकशीत त्याने गेमच्या नादात नाही, तर अभ्यासाचा कंटाळा, त्यात येणारी परीक्षा याला कंटाळून घर सोडल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. या सर्वांपासून सुटका करण्यासाठी त्याने १५ हजार रुपये आणि मोबाइल घेऊन घर सोडले. त्याने नवीन मोबाइल घेतला. मात्र याबाबत कुणाला माहिती नव्हते. जवळचे पैसे संपल्याने त्याने मदतीसाठी मैत्रिणीला फोन केला आणि याच फोनमुळे त्याच्या बेपत्ता होण्यामागचे गूढ उलगडले.

संबंधित

‘न्यू ईयर गिफ्ट’ कर्मचाऱ्यांना खरोखरच मिळेल का?- उद्धव ठाकरे
‘खासगी वीज कंपन्या माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत आणा’
आर्थिक राजधानी मुंबई; पण विकास केंद्र नवी मुंबईत
मुंबईत गारठा वाढला; किमान तापमान १७ अंशांवर
घाटकोपर विमान अपघातातील कंपनीच्या कामावर ठपका

मुंबई कडून आणखी

‘न्यू ईयर गिफ्ट’ कर्मचाऱ्यांना खरोखरच मिळेल का?- उद्धव ठाकरे
‘खासगी वीज कंपन्या माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत आणा’
आर्थिक राजधानी मुंबई; पण विकास केंद्र नवी मुंबईत
मुंबईत गारठा वाढला; किमान तापमान १७ अंशांवर
घाटकोपर विमान अपघातातील कंपनीच्या कामावर ठपका

आणखी वाचा