नऊ खासदारांचा व्यवसाय समाजसेवा, तर अठरा जण शेतकरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 07:24 AM2019-04-01T07:24:38+5:302019-04-01T07:24:55+5:30

१५ व्या लोकसभेत पश्चिम बंगाल, केरळ आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व इतर राज्यांच्या तुलनेत उच्चविद्याविभुषित होते

Nine MPs are social services, and eighteen farmers! | नऊ खासदारांचा व्यवसाय समाजसेवा, तर अठरा जण शेतकरी!

नऊ खासदारांचा व्यवसाय समाजसेवा, तर अठरा जण शेतकरी!

Next

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘मै चौकीदार हूँ!’ हे विधान भारतीय जनता पक्षाने १६ व्या लोकसभा निवडणुकीचे घोषवाक्य बनविल्याने हल्ली सर्वत्र हाच कोरस कानी पडू लागला आहे. १५ व्या लोकसभेत महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या वैयक्तिक माहितीवर नजर टाकल्यास नऊ खासदारांनी व्यवसाय ‘समाजसेवा’ असल्याचे नमूद केले आहे.

१५ व्या लोकसभेत पश्चिम बंगाल, केरळ आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व इतर राज्यांच्या तुलनेत उच्चविद्याविभुषित होते. महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ४८ खासदार सुशिक्षित असून पैकी १५ पदवीधर, १० पदव्युत्तर, दोन डॉक्टरेट केलेले, तर ११ जण डिप्लोमा होल्डर आहेत. चार डॉक्टर्सही पहिल्यांदाच खासदार झाले. शेतीविषयक ध्येयधोरणं ठरविण्यात कृषक समाजाचा सहभाग आणि प्रतिनिधित्व असेल तर त्या योजना अधिक प्रभावशाली ठरतील, असे आग्रही मत कृषीतज्ज्ञ स्वामिनाथन यांनी व्यक्त केलेले आहे. महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींची व्यवसायनिहाय वर्गवारी पाहिली तर सर्वाधिक १८ शेतकरी खासदार आहेत. मात्र, दोन-चार जणांचा अपवाद वगळता इतरांनी शेतीविषयक चर्चांमध्ये सहभागच घेतला नसल्याचे दिसून येते. शुन्य प्रहरात काही जणांनी राज्यातील दुष्काळावर प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकारकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली, इतकेच!


लोकसेवक : १० शेतकरी, १० व्यावसायिक

Web Title: Nine MPs are social services, and eighteen farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.