मध्य रेल्वेवर आजपासून विसर्जनापर्यंत रात्रकालीन विशेष लोकल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 06:18 AM2018-09-19T06:18:58+5:302018-09-19T07:01:15+5:30

भाविकांची संभाव्य वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण मार्गावर रात्रकालीन विशेष लोकल चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

Night train to the special train from today till the immersion | मध्य रेल्वेवर आजपासून विसर्जनापर्यंत रात्रकालीन विशेष लोकल

मध्य रेल्वेवर आजपासून विसर्जनापर्यंत रात्रकालीन विशेष लोकल

Next

मुंबई : गौरी विसर्जनानंतर गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संभाव्य वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण मार्गावर रात्रकालीन विशेष लोकल चालविण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेने २३-२४ सप्टेंबरच्या रात्री चर्चगेट आणि विरार स्थानकांदरम्यान आठ लोकल फेºया चालविण्याची घोषणा केली.

गणेशोत्सवातमध्य रेल्वेतर्फे १८-१९ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत सीएसएमटी ते कल्याण मार्गावर विशेष लोकल धावेल. ही लोकल सीएसएमटी येथून मध्यरात्री १ वाजून ३० मिनिटांनी सुटणार असून, कल्याण स्थानकात मध्यरात्री ३ वाजता पोहोचेल. विशेष लोकल सर्व स्थानकांवर थांबेल, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनंसपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले.

पश्चिम रेल्वेवर चर्चगेट येथून विरारकडे जाणारी पहिली विशेष लोकल अनंत चतुर्दशीच्या रात्री १ वाजून १५ मिनिटांनी सुटेल. दुसरी विशेष लोकल १ वाजून ५५ मिनिटे, तिसरी विशेष लोकल २ वाजून २५ मिनिटे आणि शेवटची विशेष लोकल ३ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. मध्य रेल्वेच्या रात्रकालीन विशेष लोकलमुळे रात्री उशिरा घरी परतणाºया भाविकांना दिलासा मिळेल.

अनंत चतुर्दशीच्या रात्री (रविवार-सोमवार) विशेष लोकल :
चर्चगेट ते विरार : १:१५, १:५५, २:२५, ३:३०
विरार ते चर्चगेट : ००:१५, ००:४५, १:४०, ३:१५

Web Title: Night train to the special train from today till the immersion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.