नेट परीक्षा ८ जुलैला! ६ मार्चपासून आॅनलाइन अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 04:23 AM2018-01-23T04:23:18+5:302018-01-23T04:23:28+5:30

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात येणा-या यूजीसी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) रविवार, ८ जुलै रोजी घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

 NET Exam 8th July! Online application from March 6 | नेट परीक्षा ८ जुलैला! ६ मार्चपासून आॅनलाइन अर्ज

नेट परीक्षा ८ जुलैला! ६ मार्चपासून आॅनलाइन अर्ज

Next

मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात येणा-या यूजीसी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) रविवार, ८ जुलै रोजी घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवार या परीक्षेसाठी ६ मार्चपासून आॅनलाइन अर्ज भरू शकतील, अशी माहिती सीबीएसईतर्फे देण्यात आली.
महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापक आणि ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी सीबीएसईतर्फे राष्ट्रीय पातळीवर परीक्षा घेण्यात येते. यंदा यूजीसी नेटची परीक्षा ८ जुलैला होणार आहे. परीक्षेसाठी दोन पेपर घेण्यात येतील. दोन्ही पेपर १०० गुणांचे असतील. ही परीक्षा देण्यासाठी वयाची अट दोन वर्षांनी वाढविली आहे. ३० वर्षे वयापर्यंतचे उमेदवार परीक्षा देऊ शकतील.   http://cbsenet.nic.in या संकेतस्थळावर १ फेब्रुवारीला यूजीसी नेट परीक्षेसंदर्भातील अधिसूचना जाहीर होईल. उमेदवारांना ६ मार्चपासून आॅनलाइन अर्ज भरता येतील. परीक्षार्थी ५ एप्रिलपर्यंत आॅनलाइन अर्ज करता येतील. तर, ६ एप्रिलपर्यंत शुल्क भरायचे आहे.

Web Title:  NET Exam 8th July! Online application from March 6

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.