प्रगतीसाठी व्यवसायात नावीन्यता हवी- मोहनदास पै

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 04:16 AM2018-08-19T04:16:28+5:302018-08-19T04:17:25+5:30

‘लीडरशीप समीट २०१८’ संपन्न; विविध चर्चासत्रांचे आयोजन

Need innovation in business for progress - Mohandas Pa | प्रगतीसाठी व्यवसायात नावीन्यता हवी- मोहनदास पै

प्रगतीसाठी व्यवसायात नावीन्यता हवी- मोहनदास पै

Next

मुंबई : इंटरनेटमुळे कार्यपद्धती सोपी झाली आहे. तेल, उत्पादन क्षेत्र आणि आयटी कंपन्यांनी डिजिटल तंत्रज्ञानामुळे प्रचंड प्रगती केली आहे. मात्र, प्रगती करायची असेल, तर उद्योग आणि व्यवसाय सतत नावीन्यपूर्ण राहिले पाहिजेत, असे मत आॅल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष टी.व्ही. मोहनदास पै यांनी मांडले.
अंधेरी पूर्वेकडील ‘द लीला’ येथे बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशनने शनिवारी आयोजित केलेल्या ‘लीडरशीप समीट २०१८ डिजिटल डिसर्प्शन’ या एकदिवसीय संवाद व चर्चासत्राच्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी बीएमएचे अध्यक्ष मूर्तझा खोराकीवाला, बीएमएचे माजी अध्यक्ष एम.डी.अग्रवाल आणि एआयएमएच्या महासंचालिका रेखा सेठी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक होते.
या वेळी झालेल्या विविध चर्चासत्रांत मॅकीन्से कंपनीचे सदस्य कुशे बहल, डी.एच. काउन्सलंटचे अध्यक्ष शैलेश हरिभक्ती, फाइव्ह एफ. वर्ल्डचे अध्यक्ष गणेश नटराजन, आयओटीचे उपाध्यक्ष रघुरामन अय्यास्वामी, अर्न्स्ट अँड यंगचे आर्थिक सेवा सल्लागार सचिन सेठ, एसेंचेर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक रघू गुल्लापल्ली, एनआरबी बियरिंग्जच्या मुख्य वित्त अधिकारी तनुश्री बग्रोडीया, वॉकहार्डचे सीआयओ वेंकट अय्यर आणि सेक्वेरेटेक कंपनीचे सहसंस्थापक पंकित देसाई, मदुराईतील अरविंद आइज हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.आर. कीम, टाटा इंडस्ट्रीचे सौविक बॅनर्जी, एफआयसीसीआयचे सरचिटणीस दिलीप चिनॉय, टाटा सन्सचे तन्मय चक्रवर्ती, अ‍ॅव्हलोन कन्सल्टिंगचे अध्यक्ष राज नायर आणि बूमिंग बँड पुस्तकाचे लेखक हर्ष पमनानी यांनी आपले विचार मांडले.
देबराज दाम यांनी स्टार्ट-अपच्या निवडीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगमोहन रिशी, सुप्रिया सचदेव व अनिल जोशी यांनी केले.

Web Title: Need innovation in business for progress - Mohandas Pa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई