Nationalist Congress Party releases list of 5 candidates for upcoming Lok Sabha elections | पार्थ पवार निवडणूक रिंगणात, अमोल कोल्हेही शिरूरच्या रणांगणात
पार्थ पवार निवडणूक रिंगणात, अमोल कोल्हेही शिरूरच्या रणांगणात

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाच उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांना मावळ मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. 

पार्थ पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. अखेर पार्थ पवार यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यासाठी यंदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय, गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेला रामराम ठोकून राष्ट्रवादीत दाखल झालेल्या अमोल कोल्हे यांनाही निवडणुकीच्या रणांगणात उतरवण्यात आले आहे. अमोल कोल्हे यांना शिरुरमधून मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. 
याचबरोबर, नाशिकमधून समीर भुजबळ निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तर बीडमधून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच, दिंडोरीमधून धनराज महाले निवडणूक लढणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी काल प्रसिद्ध केली. या पहिल्या यादीत राष्ट्रवादीकडून एकूण 10 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, धनंजय महाडिक या विद्यमान खासदारांसह अन्य सहा जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

राष्ट्रावादी काँग्रेसचे पहिल्या यादीतील  उमेदवार 
रायगड - सुनील तटकरे
बारामती - सुप्रिया सुळे
 सातारा - उदयनराजे भोसले
कोल्हापूर - धनंजय महाडिक
बुलडाणा - राजेंद्र शिंगणे 
जळगाव - गुलाबराव देवकर 
परभणी - राजेश विटेकर 
ईसान्य मुंबई   - संजय दीना पाटील 
ठाणे - आनंद परांजपे
कल्याण - बाबाजी बाळाराम पाटील 
हातकणंगले - स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा  

राष्ट्रावादी काँग्रेसचे दुसऱ्या यादीतील  उमेदवार 
मावळ- पार्थ पवार 
शिरुर- अमोल कोल्हे 
नाशिक- समीर भुजबळ 
बीड- बजरंग सोनवणे
दिंडोरी- धनराज महाले


Web Title: Nationalist Congress Party releases list of 5 candidates for upcoming Lok Sabha elections
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.