बेस्ट भाडेकपातीवर महापालिकेचे शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 06:36 AM2019-06-28T06:36:56+5:302019-06-28T06:37:10+5:30

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात ५३० बसगाड्यांची भर पडणार असून बसभाडे व मासिक बस पासच्या दरात कपात होणार आहे.

Nashik Municipal Corporation's best tenure | बेस्ट भाडेकपातीवर महापालिकेचे शिक्कामोर्तब

बेस्ट भाडेकपातीवर महापालिकेचे शिक्कामोर्तब

googlenewsNext

मुंबई - बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात ५३० बसगाड्यांची भर पडणार असून बसभाडे व मासिक बस पासच्या दरात कपात होणार आहे. किमान बसभाडे आठ रुपयांवरून पाच रुपये करण्याचा निर्णय बेस्ट समितीच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. वातानुकूलित बसगाड्यांमधून अवघ्या (किमान भाडे) सहा रुपयांत प्रवास करता येणार असतानाच याबाबतच्या प्रस्तावाला गुरुवारी महापालिकेच्या महासभेत अंतिम मंजुरी देण्यात आली. आता याबाबतची अंमलबजावणी होण्यापूर्वी आरटीओकडे यासंदर्भातील मंजुरी घेण्यात येणार आहे.

बेस्टला महापालिकेने सहाशे कोटी रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. शंभर कोटी अनुदान देताना पालिकेने काही अटी बेस्टसमोर ठेवल्या. त्यानुसार भाडेकरारावर ५३० बस घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर बस भाड्यात कपात करण्याचा प्रस्ताव बेस्ट प्रशासनाने बेस्ट समितीपुढे मांडला होता. सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिल्यानंतर बसभाडे कपातीचा प्रस्ताव एकमताने बेस्ट समितीमध्ये मंजूर करण्यात आला. त्यानंतर हा प्रस्ताव पालिका महासभेपुढे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. यासाठी २७ जून रोजी तातडीची महासभा बोलाविण्यात आली होती. येथे मंजुरी मिळाली आहे. आता प्रादेशिक वाहतूक प्राधिकरणाकडून त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यानंतरच ही भाडेकपात अमलात येईल.

बस भाड्यात ६० ते ७० टक्के कपात होईल.
सध्या बेस्टमधून २० लाख प्रवासी प्रवास करतात.
ही संख्या ४० लाखांवर नेण्याचे आव्हान बेस्टसमोर आहे.
बेस्टकडे ३३३७ बसगाड्या आहेत.
५३० बसगाड्यांची भर पडणार
८० इलेक्ट्रिक बसगाड्यांचा समावेश
बसगाड्या नोव्हेंबरपर्यंत ताफ्यात दाखल होणार

Web Title: Nashik Municipal Corporation's best tenure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.