‘त्यांचे’ नाव सांगा की आयुक्त महोदय! राजकीय दबावाबाबत तक्रार का केली नाही पोलिसांकडे?

By अतुल कुलकर्णी | Published: January 7, 2018 12:17 AM2018-01-07T00:17:26+5:302018-01-07T00:18:50+5:30

कमला मिल कम्पाऊंडमधील दोन हॉटेल्सना आग लागून १४ लोकांचे बळी गेल्यानंतर, तेथील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबविण्यासाठी एका राजकीय नेत्याने आपणावर दबाव दिल्याचा गौप्यस्फोट महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी केल्यामुळे हा नेता कोण?

Name the 'His' Commissioner, Sir! Police have not complained about political pressure? | ‘त्यांचे’ नाव सांगा की आयुक्त महोदय! राजकीय दबावाबाबत तक्रार का केली नाही पोलिसांकडे?

‘त्यांचे’ नाव सांगा की आयुक्त महोदय! राजकीय दबावाबाबत तक्रार का केली नाही पोलिसांकडे?

Next

मुंबई : कमला मिल कम्पाऊंडमधील दोन हॉटेल्सना आग लागून १४ लोकांचे बळी गेल्यानंतर, तेथील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबविण्यासाठी एका राजकीय नेत्याने आपणावर दबाव दिल्याचा गौप्यस्फोट महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी केल्यामुळे हा नेता कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कोणत्याही दबावाखाली न येता, अनधिकृत बांधकामविरोधी कारवाई सुरूच ठेवा, अशी भूमिका शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी घेतल्याने, हा नेता काँग्रेसचा आहे की भाजपाचा, याची चर्चा सुरू झाली आहे.
आयुक्त हे महापालिकेचे सर्वोच्च प्रशासकीय पद. अशी व्यक्ती दबावामुळे घाबरणे, शोभा देणारे नाही. बेकायदा बांधकाम पाडण्यास कोणी विरोध करत असेल, तर आयुक्तांनी त्याच्या तत्काळ गुन्हा दाखल करायला हवा. आयुक्तांवर राजकीय नेते दबाव आणत असतील, तर वॉर्ड आॅफिसर आणि कनिष्ठ अधिकारी व कर्मचाºयांना तर रोजच राजकीय दबावाखाली राहावे लागत असेल, दबाव आणणाºया नेत्याचे आयुक्त नाव घेणार नसतील, तर अधिकारी व कर्मचारीही ‘आपण तरी कशाला कोणाच्या वाटेला जावे,’ असे म्हणू लागतील. मुळात नगरसेवकांनी विचारेपर्यंत आयुक्त गप्प का बसले? हा प्रश्न आहे.
महापालिकेच्या सभेत हा विषय निघाला नसता, तर आयुक्तांनी स्वत:हून हा गौप्यस्फोट केला असता का? की, दबावामुळे कारवाई थांबवून गप्प बसले असते?
दबाव कोणी आणला असा सवाल काँग्रेसचे रवी राजा यांनी विचारला, तेव्हा ते तुम्हीच शोधा, असे त्यांना सांगणे आयएएस दर्जाच्या अधिकाºयास शोभते का? त्यांना काँग्रेसच्या मुंबईतील नेत्याने धमकी दिली होती का? तसे असल्यास त्यांनी मुख्यमंत्री वा मुख्य सचिवांच्या ते कानावर घातले होते का? कानावर घातले असल्यास त्यांनी त्यांना गप्प बसा असे सांगितले की, तुम्ही तुमची कारवाई नेटाने पुढे चालू ठेवा, असे सांगितले? त्याचाही खुलासा व्हावा.
आगीनंतर महापालिकेने दोन दिवसांत ६०० ते ७०० हॉटेलांवर कारवाई केली. आयुक्त म्हणतात त्याप्रमाणे तेव्हाच दबाव आला असेल, तर त्यामुळेच त्यांनी मोहीम थांबविली की काय? राजकीय दबावामुळे आयुक्तच घाबरतात, असा संदेश मुंबईकरांत गेला, तर त्यातून होणारी हानी कशी भरून निघणार?

राजकीय नेत्यांविषयी संशय
सर्व प्रश्नांची उत्तरे आयुक्त मेहता यांनी द्यायला हवीत. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनीही दबाव आणणाºयाचे नाव जाहीर करण्याची मागणी केली आहे. महापालिकेतील प्रत्येक गोष्टींवर तत्काळ टिष्ट्वट करणारे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार अद्याप गप्प आहेत. त्याचा अर्थ, त्यांनी दबाव आणला का? आता राजकीय नेत्यांविषयी संशय निर्माण झाला आहे. तो दूर करण्याची जबाबदारीही आयुक्तांची आहे.

Web Title: Name the 'His' Commissioner, Sir! Police have not complained about political pressure?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.