नालासोपाऱ्याच्या ‘द किंग्ज’ डान्स ग्रुपचा अमेरिकेत डंका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 06:37 AM2019-05-08T06:37:03+5:302019-05-08T06:37:41+5:30

मुंबईच्या रस्त्यांपासून सुरू झालेला ‘द किंग्ज’ या हिपहॉप डान्स ग्रुपचा अमेरिकेतही डंका वाजला आहे. ‘द किंग्ज’ने अमेरिकन रिअ‍ॅलिटी शो ‘वर्ल्ड आॅफ डान्स’चे विजेतेपद पटकावले आहे.

Nalaspara's 'The King' Dance Group won in United States | नालासोपाऱ्याच्या ‘द किंग्ज’ डान्स ग्रुपचा अमेरिकेत डंका

नालासोपाऱ्याच्या ‘द किंग्ज’ डान्स ग्रुपचा अमेरिकेत डंका

Next

मुंबई : मुंबईच्या रस्त्यांपासून सुरू झालेला ‘द किंग्ज’ या हिपहॉप डान्स ग्रुपचा अमेरिकेतही डंका वाजला आहे. ‘द किंग्ज’ने अमेरिकन रिअ‍ॅलिटी शो ‘वर्ल्ड आॅफ डान्स’चे विजेतेपद पटकावले आहे. या विजेतेपदासह एक मिलियन डॉलर; म्हणजेच सुमारे सात कोटी रु पयांची रक्कमही त्यांनी जिंकली आहे.
नालासोपारा येथील रहिवासी असलेल्या १४ जणांच्या ग्रुपने जबरदस्त सादरीकरण करीत परीक्षकांची मने जिंकली. अमेरिकेत रविवारी झालेल्या वर्ल्ड आॅफ डान्स शोच्या अंतिम फेरीत कॅनेडियन कन्टेम्पररी डान्सर ब्रायर नोलेट, एली आणि एव्हा या बहिणींची जोडी, व्हीपीप्ज, फिलिपाइन्सचा हिप हॉप ग्रुप, युनिटी एल.ए. तसेच दक्षिण कॅलिफोर्निया देशातील दहा ग्रुपचा सहभाग होता. जेनिफर लोपेज, नया आणि डेरेक ह्यूग स्पर्धेचे परीक्षक होते. त्यांनी ‘द किंग्ज’ला पूर्ण गुण दिले.

अनेक स्पर्धा जिंकल्या

२००८ साली सुरेश मुकुंद ‘द किंग्ज’ याने हा ग्रुप बनवला. २०११ मध्ये ‘इंडियाज् गॉट टॅलेंट ३’ या रिअ‍ॅलिटी शोचे विजेतेपद त्यांना मिळाले होते. तेव्हापासून हा ग्रुप चर्चेत आला. २०१५ साली ‘हिप हॉप डान्स चॅम्पियनशिप’मध्ये त्यांनी टॉप ३ मध्ये जागा मिळवली होती. ‘द किंग्ज’ या ग्रुपमधील डान्सरचे वय १७ वर्षांपासून २७ वर्षे आहे. तीन महिने सुरू असलेल्या या शोमध्ये ‘द किंग्ज’ने आपल्या दमदार सादरीकरणामुळे परीक्षक आणि चाहत्यांची मने जिंकली.

Web Title: Nalaspara's 'The King' Dance Group won in United States

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.