‘माय फर्स्ट व्होट सेल्फी’स्पर्धा, निवडणूक आयोगाचं नवमतदारांसाठी अभिनव उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 08:38 PM2019-04-19T20:38:57+5:302019-04-19T20:39:28+5:30

मुंबई शहर जिल्हयातील मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासन कार्यरत असुन त्याचाच एक भाग म्हणून ‘माय फर्स्ट व्होट सेल्फी’ हा नवमतदारांना प्रोत्साहन देण्यासाठीचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे

'My First Vote Selfie' Contest for new voters, Innovation Programme by Election Commission | ‘माय फर्स्ट व्होट सेल्फी’स्पर्धा, निवडणूक आयोगाचं नवमतदारांसाठी अभिनव उपक्रम

‘माय फर्स्ट व्होट सेल्फी’स्पर्धा, निवडणूक आयोगाचं नवमतदारांसाठी अभिनव उपक्रम

googlenewsNext

मुंबई : मुंबई शहर जिल्हयातील मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासन कार्यरत असुन त्याचाच एक भाग म्हणून ‘माय फर्स्ट व्होट सेल्फी’ हा नवमतदारांना प्रोत्साहन देण्यासाठीचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. मुंबई शहरात १८ ते १९  वयोगटामतील १८ हजार मतदारांची नोंद आहे. जिल्हयात धारावी,-सायन कोळीवाडा, वडाळा, माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी व कुलाबा असे १० विधानसभा मतदार संघ आहेत. यातील हे नवमतदार असुन त्यांनी लोकसभा निवडणूकीत २९ तारखेला १०० टक्के मतदानाचा हक्क बजावणे अपेक्षित आहे. या नवमतदारांना प्रोत्साहन मिळावे म्हणुन उपरोक्त उपक्रम व स्पर्धा घेतली असल्याची  माहिती मुंबई जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिली. 

माय फर्स्ट व्होट सेल्फी
साधारणत: स्पर्धेचे स्वरुप पुढीलप्रमाणे आहे. मतदानाच्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत ही स्पर्धा असेल. युवा मतदाराने मतदान केल्यानंतर मतदान केद्रांच्या विहीत १०० मीटर मयार्देच्या बाहेर येवून आपली सेल्फी काढावी व ती जिल्हा निवडणूक यंत्रणेच्या ई-मेल अथवा ९३७२८३००७१ ञ्या व्हॉट्सअप वर पाठवावी. ही सेल्फी पाठवाताना त्यांनी  स्पर्धेत सहभागाची नोंद करून आपले छायाचित्र व माहिती दयावी. त्यामध्ये नाव, आडनाव, विधानसभा मतदार संघाचे नाव/नवमतदाराचे नाव/ईपीक नंबर किंवा मतदार यादी भाग क्रमांक व मतदार यादीतील अनुक्रमांक असावा.  

सर्वांना सहभाग प्रमाणपत्र

साधारणत: प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून १०, याप्रमाणे १०० नवमतदारांची अंतिम निवड केली जाईल. त्यात तरुण, तरुणीचे प्रमाण ५० टक्के असेल. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येकाला प्रोत्साहन म्हणुन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे स्वाक्षरी असलेले सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. या निवडलेल्या १०० नवमतदारांना विधानसभा-२०१९साठी मुंबई शहर जिल्हाचे युवा मतदार दूत म्हणून नेमले जाईल. त्यांना पुढील स्विप च्या कार्याक्रमात सहभागी करून घेतले जाईल. त्यातून  10 युवा मतदारांचा त्यांच्या महाविद्यालयात/भागात स्टँडीज उभारून सन्मान केला जाईल. विधानसभा निवडणूकींच्या काळात या युवादुतांच्या मार्फत नवमतदारांची अधिक नोंदणी कशी होईल हे पाहिले जाईल. तरी मोठया प्रमाणात नवमतदारांनी ‘माय फर्स्ट व्होट सेल्फी’ या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन  केले आहे.

मतदान प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यातील माहीम विधानसभा मतदारसंघ निवडणूक कामी सज्ज झाला असून, प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण शुक्रवारी माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात संपन्न झाले अशी माहिती या विधानसभा मतदार संघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती स्वाती कारले यांनी दिली. दोन सत्रात झालेल्या या प्रशिक्षणास जवळपास चौदाशे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते . मान्य निवडणूक आयोग यांच्या निदेर्शानुसार कर्मचाºयांचे  पंधरा ते वीस व्यक्तीचे गट करून  त्यांना प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळणी, व प्रशिक्षणही या दरम्यान स्वतंत्रपणे देण्यात आले.

Web Title: 'My First Vote Selfie' Contest for new voters, Innovation Programme by Election Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.