‘हॉटेल तवा’वर महापालिकेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 02:58 AM2018-04-22T02:58:01+5:302018-04-22T02:58:01+5:30

वरळी परिसरातील खान अब्दुल गफार खान मार्गावर वरळी सी फेसच्या सुरुवातीलाच २००७मध्ये हे उपाहारगृह बांधले होते.

Municipal action taken on 'Hotel Tawa' | ‘हॉटेल तवा’वर महापालिकेची कारवाई

‘हॉटेल तवा’वर महापालिकेची कारवाई

googlenewsNext

मुंबई : वरळी सी-फेसच्या समुद्रालगत बांधण्यात आलेल्या बेकायदा बांधकामावरील स्थगिती आदेश उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर नुकतेच हे बांधकाम महापालिकेने जमीनदोस्त केले आहे. सुमारे दोन हजार चौरस फुटांच्या या जागेत ‘हॉटेल कॅफे सी-फेस’ (हॉटेल तवा) हे उपाहारगृह उभे राहिले होते. यावर पोलीस बंदोबस्तात जी दक्षिण विभागाने कारवाई केली.
वरळी परिसरातील खान अब्दुल गफार खान मार्गावर वरळी सी फेसच्या सुरुवातीलाच २००७मध्ये हे उपाहारगृह बांधले होते. या उपाहारगृहाच्या तळमजल्याचा आकार दोन हजार चौरस फूट, तर पहिला मजला हा एक हजार ५०० चौरस फूट होता. हॉटेल कॅफे सी-फेसचे अनधिकृत बांधकाम तोडल्यानंतर वरळी डेअरीसमोरचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.

Web Title: Municipal action taken on 'Hotel Tawa'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :hotelहॉटेल