मुंबईचा दहावीचा निकाल ०.३२% ने वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 01:08 AM2018-06-09T01:08:48+5:302018-06-09T01:08:48+5:30

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा आज निकाल जाहीर झाला. मुंबई विभागाचा निकाल ९०.४१ टक्के इतका लागला आहे. या वर्षी मुंबई विभागातून ३,३८,६०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

 Mumbai's SSC results increased by 0.32% | मुंबईचा दहावीचा निकाल ०.३२% ने वाढला

मुंबईचा दहावीचा निकाल ०.३२% ने वाढला

Next

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा आज निकाल जाहीर झाला. मुंबई विभागाचा निकाल ९०.४१ टक्के इतका लागला आहे. या वर्षी मुंबई विभागातून ३,३८,६०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील ३,०६,१५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालात ०.३२ टक्क्याने वाढ झाली आहे. यामध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ८८.७९ टक्के तर विद्यार्थिनींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९०.२१ इतकी आहे. मुंबईमध्येही निकालात मुलींनीच बाजी मारल्याचे दिसून आले.
मुंबई विभागाने या वर्षीही निकालातले आपले चौथे स्थान कायम राखण्यात यश मिळवले आहे. २०१७ मध्ये मुंबई विभागाचा निकाल ९०.०९ टक्के इतका लागला होता. त्यात या वर्षी ०.३२ टक्क्याची वाढ झाली.
मुंबईच्या निकालात रायगड, ठाणे, पालघर, दक्षिण मुंबई, पश्चिम मुंबई (उपनगर), पूर्व उपनगर यांचा समावेश होतो. पश्चिम उपनगराचा एकूण निकाल ९२.२१ टक्के लागला. त्याखालोखाल दक्षिण मुंबई आणि ठाण्याने बाजी मारली असून त्यांचा निकाल अनुक्रमे ९१.३४ आणि ९०.५१ टक्के इतका लागला. पश्चिम उपनगरातील परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ६२,४७० असून त्यापैकी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ५७,४३६ इतकी आहे. यामध्ये विद्यार्थी ९०.६० टक्के तर विद्यार्थिनी ९३.९३ टक्के असे उत्तीर्णतेचे प्रमाण आहे.

५ शाळा शून्य टक्के निकालाच्या
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षेसाठी
मुंबईतील एकूण ३,६७९ शाळांमधून ३ लाख ३९ हजार ८९९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी मुंबईतील ८१६ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून मुंबईतील पाच शाळा अशा आहेत ज्या शाळांमधील एकही विद्यार्थी दहावी पास झालेला नाही.
त्यामुळे या पाच शाळांचा
निकाल शून्य टक्के लागला
आहे. तब्ब्ल १,२७० शाळांना आपला निकाल ९० टक्के ते ९९.९९ टक्क्यांदरम्यान राखण्यात यश मिळाले आहे. शहरातील ७४६ शाळांनी ८० ते ९० टक्के तर ४२३ शाळांनी ७० ते ८० टक्के मिळविण्यात यश मिळविले
आहे.

Web Title:  Mumbai's SSC results increased by 0.32%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई