मुंबईची 'लाईफ लाईन' बंद, प्रवाशांचे आतोनात हाल! 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 04:12 AM2019-07-02T04:12:55+5:302019-07-03T05:15:35+5:30

रात्रीची ड्युटी करून  घरी परतणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. 

Mumbai's' Lifeline 'closed | मुंबईची 'लाईफ लाईन' बंद, प्रवाशांचे आतोनात हाल! 

मुंबईची 'लाईफ लाईन' बंद, प्रवाशांचे आतोनात हाल! 

Next

मुंबई : जगभरात मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनगरी रेल्वे सेवेचा 30 जून, 1 जुलैला झालेल्या मुसळधार पावसाने पुरता बोजवारा  उडाला. सकाळपासूनचा त्रास कमी होता की काय म्हणून रात्री साडे अकरानंतर मध्य आणि हार्बर  रेल्वेच्या ठिकठिकाणच्या रुळावर पाणी साचल्याने सर्व लोकल जाग्यावरच अनिश्चत काळासाठी अडकून पडल्या. त्यामुळे रात्रीची ड्युटी करून  घरी परतणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. 

नागरिकांना टॅक्सी, ओला, उबेर उपलब्ध होत नसल्याने घरी परतण्याचा दुसरा कोणताच पर्याय नाही. त्यामुळे अनेकजण लोकलमध्ये जागा मिळेल, त्याठिकाणी हात-पाय पसरून, तर कोणी उभ्या उभ्या डुलकी घेत पाऊस थांबण्याची आणि लोकल सुरु होण्याची प्रतीक्षा करीत आहे.

दरम्यान, स्टेशनवर थांबलेल्या प्रवासाच्या तुलनेत रेल्वे मार्गांवर मध्येच  अडकलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. यामुळे प्रवासी रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणा 'उद्धार' करीत राग व्यक्त करीत आहेत.

Web Title: Mumbai's' Lifeline 'closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.