मुंबईतील कचरा वर्गीकरणाचे प्रमाण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 02:13 AM2018-11-14T02:13:52+5:302018-11-14T02:14:27+5:30

महापालिकेच्या उपक्रमाला प्रतिसाद : स्वच्छ भारत अभियानांतर्गत हाती घेतलेल्या स्वच्छता मोहिमांचे फलित

Mumbai's garbage classification ratio increased | मुंबईतील कचरा वर्गीकरणाचे प्रमाण वाढले

मुंबईतील कचरा वर्गीकरणाचे प्रमाण वाढले

शेफाली परब-पंडित

मुंबई : वाहनांची संख्या कमी केल्यामुळे मुंबईतील काही भागांमध्ये कचराकोंडी झाल्याचे चित्र आहे. त्याचवेळी महापालिकेच्या विविध मोहिमांना नागरिकांकडूनही प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. सुका व ओला कचरा वर्गीकरणाचे प्रमाण ७३ टक्क्यांवर पोहोचले असून ९८ टक्के मुंबईकरांच्या घरातून कचरा उचलला जात असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अहवालावरून उजेडात आले आहे.

कचराभूमीसाठी नवीन जागा मिळत नसल्याने मुंबई महापालिकेने कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या. यापैकी काही उपाय आता फळास येत असून मुंबईतील कचºयाचे प्रमाण सात हजार २०० वर आले असल्याचा दावा पालिका प्रशासन करीत आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत हाती घेतलेल्या स्वच्छता मोहिमांचे हे फलित असल्याचे एका अधिकाºयाने सांगितले. याबाबत घनकचरा व्यवस्थापनाने घेतलेल्या आढाव्यात मुंबईतील केवळ दोन टक्के घरांपर्यंत पालिकेची सेवा पोहोचलेली नाही. तर सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत आॅक्टोबरमध्ये कचरा वर्गीकरण आणि घराघरांतून कचरा उचलण्याचे प्रमाण वाढले आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार मुंबईतील एकूण १८ लाख ६८ हजार घरांपैकी १८ लाख ५५ हजार घरांतून कचरा उचलण्यात आला आहे. तर ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे प्रमाण ६५ टक्क्यांवरून ७३ टक्क्यांवर पोहोचले आहे. या पुढेही अशाच प्रकारे स्वच्छता मोहिम सुरू ठेवण्याचे आवाहन आता पालिकेसमोर आहे़ त्यातूनच स्वच्छता शक्य आहे़

एकूण घरे
१८ लाख ६८ हजार
सप्टेंबर महिन्यात जमा झालेल्या कचºयाचे प्रमाण
७ हजार ५९९ मेट्रिक टन
आॅक्टोबर महिन्यात जमा झालेल्या कचºयाचे प्रमाण
७ हजार ४९२ मेट्रिक टन

जनजागृतीमुळे कचरा व्यवस्थापन

घराघरात जमा होणारा कचरा नाल्यांत अथवा रस्त्यावर न जाता कचराभूमीवर पोहोचावा, यासाठी महापालिकेने जनजागृती कार्यक्रम, कार्यशाळा आणि विविध उपक्रम गृहनिर्माण सोसायट्या व व्यावसायिक आस्थापनांमध्ये राबविले. तेथे उपस्थितांना कचरा व्यवस्थानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. यामुळेच रस्त्यांवरील कचराकुंडी भरून वाहताना आता काही ठिकाणी दिसत नाही, असे एका अधिकाºयाने सांगितले.

 

Web Title: Mumbai's garbage classification ratio increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.