मुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 05:41 AM2018-05-27T05:41:06+5:302018-05-27T05:41:06+5:30

आंबा म्हटला की, प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते. आंबा पिकविण्यासाठी शेतकºयाला वर्षभर कठोर मेहनत करावी लागते आणि इतके करूनही आंब्याला बाजारात चांगला भाव मिळाला, तरच कष्टाचे चीज होते.

Mumbai's Dabewala News | मुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार

मुंबईचे डबेवाले ठरले शेतकऱ्यासाठी मदतगार

Next

मुंबई - आंबा म्हटला की, प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते. आंबा पिकविण्यासाठी शेतकºयाला वर्षभर कठोर मेहनत करावी लागते आणि इतके करूनही आंब्याला बाजारात चांगला भाव मिळाला, तरच कष्टाचे चीज होते. जालना-अंबड येथील एका शेतकºयाने आपल्या शेतात सेंद्रीय पद्धतीने केशर आंब्याची लागवड केली. हा आंबा पिकवून त्याने तडक मुंबई गाठली, पण त्याला हवा तसा बाजारभाव मिळाला नाही. मात्र, या शेतकºयाच्या मदतीला आता मुंबईचे डबेवाले धावून आले आहेत. मुंबईच्या डबेवाल्यांनी आपल्या प्रत्येक ग्राहकाच्या डब्याबरोबर या शेतकºयाने पिकविलेला एक केशर आंबा देत तोे आवडल्यास तुम्ही कसा विकत घ्याल, याची एक चिठ्ठी देऊन त्या शेतकºयाला मदतीचा हात पुढे केलाय.
जालना जिल्ह्यातील अंबडमधला शेतकरी राहुल मुरलीधरन याने आपल्या शेतात सेंद्रीय पद्धतीने केशरी आंबा पिकविला. तो आंबा घेऊन राहुलने तडक मुंबई गाठली. मात्र, मुंबईच्या बाजारातील व्यापारी शेतकºयांकडून कमी भावात आंबा विकत घेऊन बाजारात चढ्या भावात आंबा विकतात. त्यामुळे शेतकºयाला त्याच्या वर्षभराच्या मेहनतीचे फळ मिळत नाही. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर राहुलने आपला आंबा थेट विकण्यासाठी ही निराळी स्मार्ट शक्कल शोधून काढली.
मुंबईच्या डबेवाल्याचे जाळे मुंबईत सर्वदूर पसरलेले आहे. राहुलने मुंबईच्या डबेवाल्यांशी संपर्क साधून आपली ही ‘स्मार्ट आयडिया’ डबेवाल्यांना सांगितली आणि डबेवाल्यांनीही या स्मार्ट शेतकºयाच्या स्मार्ट कल्पनेला उचलून धरले.
राहुलने आपल्या शेतात पिकविलेला हा केशर आंबा आत्तापर्यंत मुंबईच्या डबेवाल्यांनी आपल्या २५ हजार ग्राहकांपर्यंत पोहोचविला आहे. ज्यात त्यांनी हा आंबा आवडल्यास हा आंबा कसा आणि कुठे विकत घ्याल, याची एक छोटी चिठ्ठीही डब्यामार्फत ग्राहकांपर्यंत पोहोचविली आहे.

परदेशात केशर आंब्याला जबरदस्त मागणी आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात केशर आंब्याची निर्यात होते, पण भारतात या आंब्याला म्हणावी तशी बाजारपेठ उपलब्ध होत नाही. मुंबईच्या डबेवाल्यांमुळे माझ्यासारख्या शेतकºयाला आपला आंबा जगभर पाठविता आला आहे आणि त्याची किंमतही चांगली मिळत आहे.
- राहुल मुरलीधरन, शेतकरी

शेतकºयाने मेहनतीची कदर व्यापारी करीत नाहीत. त्यामुळे ते हतबल होत आहेत. काही शेतकºयांनी तर आपल्या शेतातील पिकेही उद्ध्वस्त करण्याचे प्रकार नुकतेच झाले. या शेतकºयांच्या मागे आपण उभे राहायला हवे, या भावनेतून आम्ही राहुलला छोटीशी मदत केली. २५ हजार घरांत हा आंबा पोहचलाय. जवळपास १ लाख घरांपर्यंत हा आंबा पोहोचविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
- सुभाष तळेकर, प्रवक्ते,
मुंबई डबेवाला असोसिएशन

Web Title: Mumbai's Dabewala News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.