मुंबईकरांनो, तुमची सुरक्षा तुमच्या हाती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 04:48 AM2018-06-13T04:48:59+5:302018-06-13T04:48:59+5:30

मुंबई शहर आणि उपनगरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून विकासकामांदरम्यान दुर्घटना घडण्याचे प्रमाणही वाढले आहे.

 Mumbaikars, your security in your hands! | मुंबईकरांनो, तुमची सुरक्षा तुमच्या हाती!

मुंबईकरांनो, तुमची सुरक्षा तुमच्या हाती!

Next

मुंबई  मुंबई शहर आणि उपनगरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून विकासकामांदरम्यान दुर्घटना घडण्याचे प्रमाणही वाढले आहे. क्रेन कोसळून कामगार, नागरिक जखमी होणे, बांधकामाचा भाग कोसळून कामगार, नागरिक जखमी होणे; अथवा एखादी दुर्घटना घडून एखाद्या नागरिकाचा मृत्यू होणे अशा घटनांना प्राधिकरणाला सातत्याने सामोरे जावे लागत आहे. अशा घटना घडू नयेत म्हणून प्राधिकरणाने सजग राहणे आवश्यक असतानाच प्राधिकरणाने मात्र याकडे पूर्णत: लक्ष दिलेले नाही. परिणामी दुर्घटना घडतच असून, अशा एका घटनेत तीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्यानंतर एमएमआरडीएने नागरिकांनाच अधिक जबाबदार होण्याचे आवाहन करत आपली जबाबदारी झटकली आहे.
पश्चिम द्रुतगती मार्गावर मेट्रोच्या बांधकामाकरिता खोदण्यात आलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून तीन वर्षीय मुलीच्या मृत्यूच्या दुर्दैवी घटनेवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दु:ख व्यक्त केले आहे. मात्र दु:ख व्यक्त करतानाच नागरिकांनीच अधिक जबाबदार होण्याचे आवाहन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केले आहे. गोरेगाव पूर्वेकडील ओबेरॉय मॉल येथे मेट्रोच्या कामासाठी खणण्यात आलेल्या खड्ड्यातील पाण्यात पडून शीतल करण मिश्रा या तीन वर्षीय मुलीचा मृत्यू होण्याची दुर्घटना रविवारी घडली. दुर्घटनेनंतर तिला तत्काळ जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. परिणामी प्राधिकरणाने पुन्हा एकदा नागरिकांना विनंती केली आहे की, दुर्घटना टाळण्यासाठी व स्वत:च्या सुरक्षेसाठी मेट्रो प्रकल्प उभारण्याकरिता लावलेल्या बॅरिकेड्समध्ये प्रवेश करणे कृपया टाळावे. लोकांच्या सुरक्षितेकरिता आम्ही विविध पायाभूत सुविधा प्रकल्प राबवित आहोत. तुमच्या सुरक्षेसाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी आम्हाला मदत करा, असेही आवाहन प्राधिकरणाने नागरिकांना केले आहे.

काय म्हणते प्रधिकरण?

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या दुर्घटनेवर आपले म्हणणे मांडताना नमूद केले आहे की, बेघर आणि निराधारांच्या प्रति प्राधिकरण सदैव दक्ष आणि संवेदनशील आहे. त्यांच्या सुरक्षेकरिता वनराई पोलीस ठाण्यासोबत प्राधिकरणाचा पत्रव्यवहार सुरू असतो.
प्राधिकरणाद्वारे पश्चिम द्रुतगती मार्गावरील अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो मार्ग-७ प्रकल्प राबविण्यात येत आहे. या कामाची अंमलबजावणी करताना केवळ कामगारांच्या नव्हे तर बेघर आणि निराधारांच्या सुरक्षेबाबतही प्राधिकरण दक्ष राहण्याचा प्रयत्न करते. रविवारच्या दुर्घटनेतील तीन वर्षीय मुलाच्या बुडून मृत्यूनंतर तशीच अपेक्षा प्राधिकरणाला प्रतिबंधित परिसरात खासकरून लहान मुलांना एकटे सोडण्याबाबत नागरिकांनी घ्यावयाच्या सुरक्षिततेबाबत आहे.

Web Title:  Mumbaikars, your security in your hands!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.