समुद्रमार्गे मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 02:39 AM2018-12-17T02:39:55+5:302018-12-17T02:40:35+5:30

चार वर्षांत काम पूर्ण : वेळ व इंधनात ३४ टक्के होणार बचत

Mumbaikars to travel through sea ... | समुद्रमार्गे मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट...

समुद्रमार्गे मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट...

Next

मुंबई : वाहतूककोंडीत तासन्तास अडकून पडणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास सुसाट करणाºया कोस्टल रोड प्रकल्पाचा श्रीगणेशा अखेर आज झाला. या प्रकल्पामुळे मुंबईकरांची वेळ व इंधनात(३४ टक्के) मोठी बचत होणार आहे. चार वर्षांमध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे. विशेष म्हणजे, हा मार्ग टोल फ्री असल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते कांदिवलीपर्यंत २९.२ कि़मी.चा सागरी मार्ग बांधण्यात येणार आहे. महापालिकेमार्फत प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी लिंकपर्यंतच्या कामाला ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. या प्रकल्पामुळे ९६ लाख ८७ हजार ५१० चौरस फुटांचे भराव क्षेत्रही उपलब्ध होणार आहे. या भराव क्षेत्रात मुंबईकरांचे मनोरंजन व विरंगुळ्याचीही पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे देशातील हा पहिला प्रकल्प मुंबईकरांनाही मोकळा श्वास घेण्याची संधी देणार आहे.

प्रकल्पाची डेडलाइन व खर्च
हा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे. असा करारचे ठेकेदाराबरोबर करण्यात आला आहे. त्यामुळे दिलेल्या मुदतीत महापालिकेच्या हद्दीतील प्रकल्पाचे काम पूर्ण न झाल्यास ठेकेदाराला कोणताही नवा पैसा देण्यात येणार नाही, असे आयुक्त अजोय मेहता यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकल्पाचा मूळ खर्च आठ हजार ४२९ कोटी रुपये आहे, तर विविध करापोटी सहा हजार कोटी अधिक खर्च असल्याने, या प्रकल्पाचा खर्च १२ हजार कोटींवर जाणार आहे. त्यामुळे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे उद्दीष्ट पालिकेसमोर आहे़

भूमिगत वाहनतळ
कोस्टल रोडसाठी ९० टक्के भराव क्षेत्र उपलब्ध होणार आहे. यापैकी ७८ टक्के जागेवर प्रसाधनगृह, जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, फुलपाखरू उद्यान, सागरी पदपथ, खुले नाट्यगृह, लहान मुलांसाठी उद्याने व खेळाची मैदाने, पोलीस चौकी, बस थांबे, रस्ता ओलांडण्यासाठी भूमिगत पदपथाचा समावेश असणार आहे. त्याचबरोबर, एक हजार ६२५ एवढी वाहन क्षमता असलेल्या तीन भूमिगत वाहनतळांचाही यात समावेश असणार आहे.

अग्निशमनाची प्रभावी यंत्रणा
च्आगीची संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी बोगद्यांमध्ये स्वयंचलित अग्निशमन यंत्रणा कार्यरत राहणार आहे. यामध्ये बोगद्याच्या अंतर्गत छताला जागोजागी ‘स्प्रिंकलर्स’ बसविले जाणार आहेत. याचबरोबर, फायर एक्स्टिंग्विशर, फायर हायड्रंट, फायर होज रील, फीक्स फायर सीस्टम इत्यादी बाबीदेखील बोगद्यांमध्ये असणार आहेत.
च्मुबलक प्रमाणात व उच्च दाबाने पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी बोगद्यांमधील अग्निशमन यंत्रणेला जोडलेली व नियमितपणे कार्यरत राहणारी स्वतंत्र जलवाहिनीदेखील असणार आहे.

मुंबईसाठी नवीन पर्यटन स्थळ : या प्रकल्पासाठी ४.२ दशलक्ष साधनसामुग्री लागणार आहे. मात्र, हे साहित्य रस्त्यावरून आणल्यास रस्त्याचे नुकसान होईल. त्यामुळे सर्व साहित्य समुद्रमार्गे आणण्यासाठी दोन जेट्टी बांधण्यात येणार आहेत. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या दोन जेट्टी पर्यटनासाठी उपलब्ध होतील, असे आयुक्तांनी सांगितले.

Web Title: Mumbaikars to travel through sea ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई