पाणी तुंबण्यापासून मुंबईकरांची सुटका नाहीच, काँक्रीटीकरणामुळे पाणी जिरण्यास उरली नाही जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 04:56 AM2018-07-12T04:56:02+5:302018-07-12T04:56:17+5:30

मुंबईत झपाट्याने सुरू असलेल्या काँक्रीटीकरणामुळे पावसाचे पाणी जिरणे व मुरण्यासाठी जागाच शिल्लक नाही. त्यात पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये अडकणाऱ्या झाडांच्या मुळांनी अडचणीत भर घातली आहे.

Mumbaikars are not free from tumble of water | पाणी तुंबण्यापासून मुंबईकरांची सुटका नाहीच, काँक्रीटीकरणामुळे पाणी जिरण्यास उरली नाही जागा

पाणी तुंबण्यापासून मुंबईकरांची सुटका नाहीच, काँक्रीटीकरणामुळे पाणी जिरण्यास उरली नाही जागा

Next

मुंबई - मुंबईत झपाट्याने सुरू असलेल्या काँक्रीटीकरणामुळे पावसाचे पाणी जिरणे व मुरण्यासाठी जागाच शिल्लक नाही. त्यात पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये अडकणाऱ्या झाडांच्या मुळांनी अडचणीत भर घातली आहे. त्यामुळे काँक्रीटीकरणावर नियंत्रण येईपर्यंत मुंबईत पाणी तुंबण्याची नवीन ठिकाणे निर्माण होतच राहतील. त्यामुळे तुंबईतून मुंबईकरांची सुटका नाहीच, असे संकेत आयुक्त अजय मेहता यांनी आज स्थायी समितीच्या बैठकीत दिले.
मुंबईत गेले चार दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसात मुंबईकरांची दैना उडाली. या प्रकरणी पालिका प्रशासनाला धारेवर धरत आयुक्तांनी निवेदन करावे, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी लावून धरली. मात्र आयुक्तांच्या स्पष्टीकरणाने नगरसेवकच अवाक् झाले. महापालिकेने गेल्या काही महिन्यांत केलेल्या विविध उपाययोजनांमुळे अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा लवकर झाला. पाणी उपसण्यासाठी उच्च क्षमतेचे पंप बसविल्यामुळे रेल्वेची गती मंदावली, पण थांबली नाही, असा आयुक्तांनी बचाव केला.

कौतुक नको, दखल तरी घ्या
पाणी तुंबल्यामुळे रहिवाशांचे हाल स्थायी समितीत मांडणाºया नगरसेवकांना आयुक्तांनीच उलट सुनावले. गेले चार दिवस मुसळधार पावसात महापालिकेचे साडेतीन ते चार हजार अधिकारी आणि कर्मचारी भरपावसात रस्त्यावर कार्यरत होते. पालिकेचे अभियंते अनुभवी आहेत, त्यांच्या कामाची त्यांना जाण आहे. यापैकी दोन-तीन कामचुकार असतील. पण ९० टक्के प्रामाणिक आहेत. त्यांच्या कामाचे कौतुक करू नका एकवेळ, परंतु त्याची दखल तरी घ्या, असा टोला लगावत आयुक्तांनी आपल्या अधिकाºयांची पाठराखण केली.

काँक्रीटीकरणावर नियंत्रण आणणार
काँक्रीटीकरणामुळे मुंबईत पाणी मुरण्यासाठी जागा उरलेली नाही. त्यामुळे यावर नियंत्रण आणण्यासाठी मुंबईच्या विकास नियोजन आराखड्यातच तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार बांधकाम करताना थोडी जागा पाणी मुरण्यासाठी शिल्लक ठेवणे बंधनकारक असणार आहे. उद्यान, मनोरंजन मैदानांमध्येही काँक्रीटीकरणाला परवानगी नाही. मुलांना तिथे खेळता यावे, तिथे छोटेसे तळे असणे अपेक्षित असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

ब्रिमस्टोवडच्या जागी नवीन योजना
काही वेळा ब्रिमस्टोवड नव्हे, तर छोट्या छोट्या उपायांमुळे पाणी तुंबण्याचे प्रमाण घडले. यामध्ये पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये झाडांची मुळे जाणे, युटिलिटीमुळे पर्जन्यवाहिन्यांना धोका, वाहतूक पोलिसांची परवानगी यांचाही समावेश असतो. म्हणूनच ब्रिमस्टोवड नव्हेतर, काळानुरूप नवीन आराखडा आणण्याची गरज आहे, असे मत आयुक्तांनी व्यक्त केले.

आयुक्तांचा
नगरसेवकांनाच टोला
मुंबई शहर हे बेटावर वसले आहे, हे विसरून चालणार नाही. कारणे देऊन आजचे मरण उद्यावर टाकण्याची माझी सवय नाही. गेल्या वर्षी २९ आॅगस्टला पडलेल्या पावसानंतर महापालिकेने पाणी तुंबणाºया ठिकाणांचा अभ्यास करून उपाययोजना केल्या. नगरसेवक विभागात हजर राहिल्यास त्यांना पावसाळ्यात कुठे पाणी साचले, कुठे काय घटना घडली, याची माहिती मिळेल, असा टोला त्यांनी लगावला.
पूर्व उपनगराला
दिलासा नाहीच
मुंबईत जोरदार पाऊस पडला तर अनेक भागात पाणी भरते. गांधी मार्केट परिसर हा सखल भाग आहे. या भागातील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पंपिंग स्टेशनची गरज आहे. माहुल येथे पंपिंग स्टेशन उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र यासाठी पर्यावरण विभागाच्या परवानगीची गरज आहे. त्यासाठी काही वेळ लागणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले.

Web Title: Mumbaikars are not free from tumble of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई