मुंबईकरांना थंडीची चाहूल; तापमानातील चढउतार कायम, पारा ३६ अंशाहून ३३ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 01:53 AM2017-11-05T01:53:51+5:302017-11-05T01:54:08+5:30

आॅक्टोबर हिटने दिलेल्या तडाख्यानंतर आता मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात कमालीचे चढउतार नोंदविण्यात येत आहेत. कमाल तापमानाचा पारा ३६ अंशाहून ३३ अंशावर घसरला आहे. किमान तापमान २६ ते २४ अंशाहून २१ अंशावर घसरले आहे.

Mumbaikar shakes the cold; Temperature fluctuations continued, from 36 degrees to 33 degrees on mercury | मुंबईकरांना थंडीची चाहूल; तापमानातील चढउतार कायम, पारा ३६ अंशाहून ३३ अंशावर

मुंबईकरांना थंडीची चाहूल; तापमानातील चढउतार कायम, पारा ३६ अंशाहून ३३ अंशावर

Next

मुंबई : आॅक्टोबर हिटने दिलेल्या तडाख्यानंतर आता मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात कमालीचे चढउतार नोंदविण्यात येत आहेत. कमाल तापमानाचा पारा ३६ अंशाहून ३३ अंशावर घसरला आहे. किमान तापमान २६ ते २४ अंशाहून २१ अंशावर घसरले आहे. किमान तापमानात घसरण नोंदविण्यात येत असली तरी कमाल तापमानात चढउतार नोंदविण्यात येत असून, कमाल तापमान ३५, ३६ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. किमान तापमानातील घसरणीमुळे मुंबईकरांना थंडीची चाहूल लागल्याचे चित्र आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या उर्वरित भागात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. ५ ते ८ नोव्हेंबरदरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
५ व ६ नोव्हेंबर रोजी मुंबई व आसपासच्या परिसरातील आकाश निरभ्र राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये
मुंबई २१, रत्नागिरी १८.७, भिरा १७, पुणे १२.५, अहमदनगर १२.८, जळगाव १५.२, कोल्हापूर १७.५, महाबळेश्वर १४.६

Web Title: Mumbaikar shakes the cold; Temperature fluctuations continued, from 36 degrees to 33 degrees on mercury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई