नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज; चौपाटी, हॉटेल्समध्ये गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 05:32 AM2018-12-31T05:32:49+5:302018-12-31T05:33:15+5:30

२०१८ या वर्षाला निरोप देत २०१९ चे स्वागत करण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. ३१ डिसेंबर रोजी सोमवार असल्याने अनेकांनी एक दिवस अगोदरच म्हणजे २०१८ या सरत्या वर्षाच्या शेवटच्या रविवारचा मुहूर्त साधत जल्लोष करून नववर्षाचे स्वागत केले.

 Mumbaikar ready for new year's reception; Chowpatty, crowd in hotels | नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज; चौपाटी, हॉटेल्समध्ये गर्दी

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज; चौपाटी, हॉटेल्समध्ये गर्दी

Next

मुंबई : २०१८ या वर्षाला निरोप देत २०१९ चे स्वागत करण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. ३१ डिसेंबर रोजी सोमवार असल्याने अनेकांनी एक दिवस अगोदरच म्हणजे २०१८ या सरत्या वर्षाच्या शेवटच्या रविवारचा मुहूर्त साधत जल्लोष करून नववर्षाचे स्वागत केले. यात तरुणाईची संख्या मोठी असल्याचे पाहायला मिळाले.
रविवारी सर्वत्र नववर्ष स्वागताच्या पार्ट्यांच्या तयारीची चर्चा सुरू असल्याचे चित्र होते. मद्याच्या दुकानांसमोर नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती. सोमवारी या दुकानांसमोर प्रचंड गर्दी होण्याची शक्यता असल्याने मद्यप्रेमींनी रविवारीच स्टॉक करून ठेतला. सर्वत्र नववर्ष स्वागताचे बेत ठरवले जात होते. ज्यांना सोमवारी सुट्टी घेणे शक्य नाही अशा नागरिकांनी विशेषत: तरुणाईने रविवारीच नववर्ष स्वागतासाठी मुंबईतील विविध चौपाटी, मरिन लाइन्स, गेट वे आॅफ इंडिया यासह अनेक ठिकाणी गर्दी केली होती. रविवार असल्याने अनेकांनी घरी पंचपक्वान्नांचा बेत आखला होता तर अनेकांनी हॉटेलमध्ये जाऊन जेवण्याची संधी साधून घेतली. सरकारी नोकरीतील अनेकांनी तसेच काही खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सोमवारी रजा घेतली आहे. अनेक जण वर्ष अखेरीच्या आठवड्यात मुंबईबाहेर फिरण्यासाठी गेले आहेत. तर काही जणांनी शनिवार, रविवार व सोमवार जोडून रजा घेतली.
कॉर्पोरेट कंपन्यांमधील कर्मचाºयांनी वर्षअखेरीसाठी नियोजन केले असून नववर्ष मित्र व सहकाºयांसोबत साजरे करण्याचा बेत आखला आहे. काही जणांनी नववर्षाचे स्वागत केवळ कुटुंबासह करण्याचे ठरवले आहे. ३१ डिसेंबरला हॉटेल, पर्यटनस्थळे येथे प्रचंड गर्दी होण्याची शक्यता असल्याने अनेकांनी रविवारी एक दिवस अगोदर कुटुंबीयांसोबत बाहेर फिरायला जात नववर्षाचे स्वागत केले.

सर्वच मार्गांवर कोंडी
रविवारी साधारणत: मुंबईतील रस्त्यांवरील वाहतूक कमी असते, मात्र रविवारी सेलीब्रेशन मूडमध्ये असलेल्या मुंबईकरांमुळे वाहतुकीत बºयापैकी वाढ झाल्याचे चित्र होते. विविध मॉल, स्थानिक बाजारपेठा गर्दीने फुलल्या होत्या. उद्याने, सिनेमागृहे, पर्यटनस्थळे या ठिकाणीदेखील मोठी गर्दी होती.
मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे अनेक गट मुंबईत फिरण्यासाठी आलेले असल्याने लोकलमध्येदेखील जास्त गर्दी होती. नववर्षाच्या स्वागतासाठी काही जणांनी सहकुटुंब फिरण्याचा बेत आखल्याने रविवारी मुंबईबाहेर जाणाºया सर्वच मार्गांवर वाहतूककोंडी झाली होती.

आज मध्यरात्री विशेष लोकल
चर्चगेट ते विरार
रात्री १ वाजून १५ मिनिटे, रात्री २ वाजता, रात्री २.३०, रात्री ३ वाजून २५ मिनिटे,
विरार ते चर्चगेट
रात्री १२ वाजून १५ मिनिटे, रात्री १२ वाजून ४५ मिनिटे, रात्री १ वाजून ४० मिनिटे, रात्री ३ वाजून ०५ मिनिटे
सीएसएमटी ते कल्याण
रात्री १ वाजून ३० मिनिटे
कल्याण ते सीएसएमटी
रात्री १ वाजून ३० मिनिटे
सीएसएमटी ते पनवेल
१ वाजून ३० मिनिटे
पनवेल ते सीएसएमटी
१ वाजून ३० मिनिटे,

Web Title:  Mumbaikar ready for new year's reception; Chowpatty, crowd in hotels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.