मुंबई विद्यापीठाच्या आॅनलाइन असेसमेंटच्या निर्णयाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 06:34 AM2017-11-02T06:34:23+5:302017-11-02T06:34:36+5:30

मुंबई विद्यापीठाच्या आॅनलाइन असेसमेंटच्या निर्णयाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आश्वासन प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी बुधवारी दिले आहे. विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर आणि विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींना घेतलेल्या भेटीदरम्यान कुलगुरूंनी हे आश्वासन दिले.

Mumbai University's online assessment decision to make judicial inquiry assured | मुंबई विद्यापीठाच्या आॅनलाइन असेसमेंटच्या निर्णयाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आश्वासन

मुंबई विद्यापीठाच्या आॅनलाइन असेसमेंटच्या निर्णयाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आश्वासन

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या आॅनलाइन असेसमेंटच्या निर्णयाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आश्वासन प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी बुधवारी दिले आहे. विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर आणि विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींना घेतलेल्या भेटीदरम्यान कुलगुरूंनी हे आश्वासन दिले.
या आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, स्टुडन्ट लॉ कौन्सिलसह माजी सिनेट सदस्यांनी माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर यांच्यासह शिंदे यांची भेट घेतली. त्या वेळी शिंदे यांनी संबंधित प्रकरणाच्या चौकशीबाबत राज्यपालांकडून अंतिम निर्णयाची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. या वेळी मुणगेकर यांनी सांगितले की, या भेटीत विद्यापीठाच्या निकालाबाबत झालेला गोंधळ आणि परीक्षा शुल्काबाबत सविस्तर चर्चा झाली. शिवाय वाढीव शुल्क मागे घेताना २५ टक्के शुल्ककपात करण्याबाबत विशेष बैठक आयोजित करून निर्णय घेण्याचे आश्वासन कुलगुरूंनी दिले.
मेरिट ट्रॅक या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी मुणगेकर यांनी कुलगुरूंकडे
केली आहे. सोबतच ज्या विद्यार्थ्यांचे निकाल उत्तरपत्रिका गहाळ झाल्याने प्रलंबित
आहेत, त्यांना किमान ५०
टक्के गुण देण्याची मागणीही मुणगेकर यांनी केली आहे, तर आगामी परीक्षांच्या निकालातही गोंधळ होऊ नये, म्हणून ंआॅफलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा सल्लाही त्यांनी विद्यापीठाला दिला आहे.

...तोपर्यंत परीक्षापुढे ढकला!
विद्यापीठातील अद्याप २९ हजार विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर झालेले नाहीत, तर १०० राखीव विद्यार्थ्यांचे निकालही प्रलंबित आहेत. त्यामुळे या परीक्षांचे निकाल जाहीर होईपर्यंत परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थी संघटनांनी केली आहे.

Web Title: Mumbai University's online assessment decision to make judicial inquiry assured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.