मुंबई विद्यापीठाच्या बी.एस्सी सत्र सहाची परीक्षा उद्यापासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 06:19 AM2019-04-24T06:19:35+5:302019-04-24T06:19:48+5:30

सात जिल्ह्यांतील १२५ केंद्रे; ९ हजारांहून अधिक विद्यार्थी

Mumbai University's B.Sc Season 6 examination from tomorrow | मुंबई विद्यापीठाच्या बी.एस्सी सत्र सहाची परीक्षा उद्यापासून

मुंबई विद्यापीठाच्या बी.एस्सी सत्र सहाची परीक्षा उद्यापासून

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या २०१९ च्या उन्हाळी सत्राची तृतीय वर्ष बी.एस्सी सत्र सहाची परीक्षा २५ एप्रिलपासून सुरू होत असून १० मेपर्यंत चालणार आहे. या परीक्षेस ९,४१६ विद्यार्थी बसणार असून सात जिल्ह्यांतील १२५ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होत आहे.

तृतीय वर्ष बी.एस्सी सत्र सहाच्या परीक्षेत मुलींची संख्या लक्षणीय आहे. ५,६३७ विद्यार्थिनी तर ३,७७९ विद्यार्थी ही परीक्षा देतील. ही परीक्षा मुंबईसह, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पालघर या जिल्ह्यांतील व महाराष्ट्राबाहेरील दादरा नगर हवेली येथील एका केंद्रासह एकूण १२५ परीक्षा केंद्रांवर होईल. २०१९-२० या शैक्षणिक वर्षापासून बी.एस्सी या अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली आहे तसेच अभ्यासक्रमदेखील सुधारित करण्यात आलेला आहे.

या परीक्षेसाठी परीक्षा विभागातील हस्तलिखित विभाग, परीक्षा व निकाल विभाग, कॅप विभाग व संगणक विभागातील अधिकारी तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी तयारी केली असून परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी या परीक्षेच्या सज्जतेचा आढावा घेतला. या वेळी परीक्षा वेळेवर सुरू करून परीक्षांचे निकाल वेळेवर जाहीर करण्यास विद्यापीठाचे प्राधान्य राहील, अशी प्रतिक्रिया डॉ. पाटील यांनी दिली.

सर्वाधिक विद्यार्थी ठाणे जिल्ह्यातील
सात जिल्ह्यांतील १२५ केंद्रांवर आयोजित करण्यात आलेल्या या बी.एस्सी सत्र सहाच्या परीक्षेला बसणारे सर्वांत जास्त म्हणजे २,८३० विद्यार्थी हे ठाणे जिल्ह्यातील आहेत. तर, याच जिल्ह्यातून सर्वाधिक म्हणजे १,७३३ विद्यार्थिनी परीक्षा देणार आहेत.

Web Title: Mumbai University's B.Sc Season 6 examination from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा