'मिट्टी के सितारे' मधून उभरणार पालिका शाळांतील विद्यार्थ्यांचे टॅलेंट  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 04:39 PM2019-01-24T16:39:57+5:302019-01-24T16:40:27+5:30

मोठया इंग्रजी आणि दर्जेदार शाळांतील विद्यार्थ्यांमधील प्रतिभा तर तिथे आयॊजीत होणाऱ्या अनेक उपक्रमांमधून समोर येते मात्र पालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला  भरारी घेण्यासाठी फारसा वाव मिळत नाही.

Mumbai School news | 'मिट्टी के सितारे' मधून उभरणार पालिका शाळांतील विद्यार्थ्यांचे टॅलेंट  

'मिट्टी के सितारे' मधून उभरणार पालिका शाळांतील विद्यार्थ्यांचे टॅलेंट  

Next

मुंबई -  मोठया इंग्रजी आणि दर्जेदार शाळांतील विद्यार्थ्यांमधील प्रतिभा तर तिथे आयॊजीत होणाऱ्या अनेक उपक्रमांमधून समोर येते मात्र पालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला  भरारी घेण्यासाठी फारसा वाव मिळत नाही. मात्र हेच चॅलेंज स्वीकारून पलिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी मिट्टी के सितारे या नव्या टॅलेंट हंटची अधिकृत घोषणा अमृता फडणवीस यांनी केली. मुंबई पालिकेतील ११८७ पालिका शाळांसाठी हा उपक्रम खुला असून विद्यार्थी यामध्ये सहभागाई होऊन आपल्या प्रतिभा सादर करू शकणार आहेत. शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना संगीत उद्योगातील प्रख्यात कलाकारांसह स्टेजवर कार्य करण्याची संधी मिळणार आहे. अमृता फडणवीस यांचे दिव्याज फाउंडेशन, एमपॉवर, शंकर महादेवन ऍकेडमी यांच्या सहकार्याने मिट्टी के सितारे या मिशनची संकल्पना मांडण्यात आली आहे. 

प्रथमच महापालिकेच्या मुलांसाठी अशा मोठ्या प्रमाणावर प्रकल्प आयोजित केला जात आहे. हाय-एंड स्कूलमध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी संगीत प्रशिक्षण करणे शक्य आहे, परंतु 'मिट्टी की सितारे' द्वारा पालिका शाळांतील लपून राहिलेली रत्ने ही समोर येण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया मुंबईचे महानगर आयुक्त अजॉय मेहता यांनी दिली.

'मिट्टी के सितारे' साठी ऑडीशन्स फेब्रुवारीपासून सुरु होणार असून पालिका शाळांतील ७ ते १५ वयोगटातील मुलांसाठी ते असणार आहेत. आपल्या गायन व वाद्य संगीताच्या व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप्स त्यांनी संकेतस्थळावर अपलोड करायच्या आहेत. शोमध्ये ४ ऑडिशन्सचे राऊंड असणार असून यामुळे पालिका शाळांतील तब्ब्ल १. २ लाख शालेय मुलांमधून उत्कृष्ट व प्रतिभाशाली मुलांची निवड करण्यात येणार आहे. प्रत्येक सहभागी शाळा ऑडिशनच्या पहिल्या फेरीत स्पर्धा करण्यासाठी ५ विद्यार्थ्यांची निवड करतील. पुढच्या फेरीमध्ये २०-३० विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट करण्यात येईल आणि त्यानां प्रशिक्षण देण्यात येईल अशी माहिती अमृता  फडणवीस यांनी दिली. 


मिट्टी के सितारे' ऑडीशन्स फेब्रुवारीपासून सुरु होणार असून विस्तृत प्रशिक्षण मे पर्यंत सुरू राहील, त्यानंतर याचा प्रस्तावित ग्रँड फिनाले आयोजित केला जाणार आहे. मुंबईपासून या नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असली तरी ते फक्त मुंबईपुरता मर्यादित न राहता नवी मुंबई , ठाणे आणि बऱ्याच शहरांत प्यूद्धच्या वर्षी सुरु करण्यात येईल अशी माहिती फडणवीस यांनी दिली.  

ज्या विद्यार्थ्याकडे प्रतिभा आहे , कौशल्य आहे पण ते ओळखले जात नाही अशा मुलांसाठी ही  एक असामान्य संधी आहे. मिट्टी के सितारे हा पालिका शाळांतील आणि वंचित क्षेत्रातील मुलांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणारा भारतातील पहिला शो असेल ज्याच्या मदतीने आपल्या देशातील प्रतिभा बहरून येईल. 

-शंकर महादेवन

Web Title: Mumbai School news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.