Mumbai Rains LIVE :  मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2018 07:54 AM2018-06-23T07:54:04+5:302018-06-23T15:11:43+5:30

गेला आठवडाभर दडी मारलेल्या पावसानं पहाटेपासूनच मुंबई शहरासह उपनगरांत जोरदार हजेरी लावली आहे.

Mumbai rains live updates | Mumbai Rains LIVE :  मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची हजेरी

Mumbai Rains LIVE :  मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची हजेरी

Next

मुंबई - गेला आठवडाभर दडी मारलेल्या पावसानं पहाटेपासूनच मुंबई शहरासह उपनगरात जोरदार हजेरी लावली आहे. पावसाच्या हजेरीमुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेले नागरिक सुखावले आहेत. 

Live Updates :
- दादर, वडाळा, परेल परिसरात रिमझिम पाऊस पडत आहे. तर वसई, विरार परिसरातही पावसाचा जोर वाढला असून काही ठिकाणी पाणी साचले आहे. 
- लोकलच्या तीनही मार्गांवरची वाहतूक सुरळीत
- लोकलच्या तीनही मार्गांवरची वाहतूक सुरळीत
- ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस
- येत्या 48 तासात कोकणात अतिवृष्टीचा इशारा
- 29 जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता 



 



 

दरम्यान, राज्यातील बहुतांश भागात येत्या मंगळवारपर्यंत चांगला पाऊस होईल, असा अंदाज भारतीय कृषी हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून मान्सून राज्यात पुन्हा पाऊस सक्रीय झाला असून, पुढील चार दिवस चांगल्या पावसाचे राहणार आहेत.

(सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचे थैमान)

कोकणात २५ आणि २६ जूनला तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, तर काही ठिकाणी अतिवृष्टी होईल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील ४८ तासांत तुरळक ठिकाणी पावसाची जोरदार वृष्टी होईल. विदर्भात पुढील ४८ तासांत तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Web Title: Mumbai rains live updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.