मुंबईतील १९ रेल्वे स्थानकांचे रूपडे पालटणार , एमआरव्हीसीचा ‘स्टेशन इम्प्रुव्हमेंट’ प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 04:49 AM2018-04-16T04:49:20+5:302018-04-16T04:49:20+5:30

शहरातील ७६ लाख रेल्वे प्रवाशांच्या सुखद प्रवासासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) मध्य रेल्वेवरील ११ आणि पश्चिम रेल्वेवरील ८ रेल्वे स्थानकांच्या सुधारणेला ‘स्टेशन इम्प्रूव्हमेंट’ प्रकल्पांतर्गत सुरुवात केली आहे. त्यामुळे आता मुंबईतील १९ रेल्वे स्थानकांचे रूपडे पालटणार आहे. बोर्डाची मंजुरी असलेल्या या प्रकल्पाची डेडलाइन सन २०२२ अशी निश्चित करण्यात आली आहे.

 Mumbai railway stations will change, MRVC's 'Station Improvment' project | मुंबईतील १९ रेल्वे स्थानकांचे रूपडे पालटणार , एमआरव्हीसीचा ‘स्टेशन इम्प्रुव्हमेंट’ प्रकल्प

मुंबईतील १९ रेल्वे स्थानकांचे रूपडे पालटणार , एमआरव्हीसीचा ‘स्टेशन इम्प्रुव्हमेंट’ प्रकल्प

googlenewsNext

- महेश चेमटे
मुंबई  - शहरातील ७६ लाख रेल्वे प्रवाशांच्या सुखद प्रवासासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) मध्य रेल्वेवरील ११ आणि पश्चिम रेल्वेवरील ८ रेल्वे स्थानकांच्या सुधारणेला ‘स्टेशन इम्प्रूव्हमेंट’ प्रकल्पांतर्गत सुरुवात केली आहे. त्यामुळे आता मुंबईतील १९ रेल्वे स्थानकांचे रूपडे पालटणार आहे. बोर्डाची मंजुरी असलेल्या या प्रकल्पाची डेडलाइन सन २०२२ अशी निश्चित करण्यात आली आहे.
स्थानक सुधारणा प्रकल्प तीन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. स्थानकातील प्रवेशद्वारे, विश्रामगृहे-सुविधा आणि प्रत्यक्षात वापरात येणारी स्थानकातील मोकळी जागा यावर या प्रकल्पांतर्गत विशेष भर देण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्थानकांतील सद्य:सुविधा, स्थानकांवरील ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या, स्थानक प्रवेशद्वार, फलाट या बाबींमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार आहेत. येथील प्रकल्पांसाठी सुमारे ८८० कोटी खर्च येणार आहे, असे एमआरव्हीसीच्या अधिकाºयांनी सांगितले.
सुधारणा करण्यात येणाºया रेल्वे स्थानकांमध्ये मध्य रेल्वेवरील भांडुप, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, शहाड, नेरळ आणि कसारा या स्थानकांचा समावेश आहे. तर हार्बर मार्गावरील जीटीबी नगर, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द स्थानकांची निवड करण्यात आली आहे. तसेच पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल (लोकल), जोगेश्वरी, कांदिवली, मीरा रोड, भार्इंदर, वसई रोड, नालासोपारा आणि विरार रेल्वे स्थानकांचाही स्टेशन ‘इम्प्रुव्हमेंट’ यादीत समावेश करण्ययात आलेला आहे.

पुनर्विकासालाही प्राधान्य
रेल्वे स्थानक सुधारणा प्रकल्पासोबतच भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळ (आयआरएसडीसी) देशभरातील १७ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करणार आहे. यात मुंबई सेंट्रल आणि वांद्रे स्थानकांचा समावेश आहे. पुनर्विकास करताना येथे शॉपिंग कॉम्प्लेक्स, सिनेमागृहे यांचादेखील समावेश करण्यात येणार आहे. स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पाचे काम आयआरएसडीसी आणि एमआरव्हीसी एकत्रपणे पाहणार आहे.

या स्थानकांमध्ये होणार सुधारणा
मध्य रेल्वे : भांडुप, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, शहाड, नेरळ, कसारा
हार्बर रेल्वे : जीटीबी नगर, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द
पश्चिम रेल्वे : मुंबई सेंट्रल (लोकल), जोगेश्वरी, कांदिवली, मीरा रोड,
भार्इंदर, वसई रोड, नालासोपारा आणि विरार

Web Title:  Mumbai railway stations will change, MRVC's 'Station Improvment' project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.