Mhada Lottery 2018 Live : विनोद शिर्के आणि अख्तर मोहम्मद 5 कोटी रुपयांच्या घराचे मानकरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 09:55 AM2018-12-16T09:55:33+5:302018-12-16T17:09:51+5:30

Mumbai Mhada Lottery 2018 : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या १ हजार ३८४ घरांसाठीच्या लॉटरीला सुरुवात झाली आहे.

Mumbai Mhada Lottery 2018 Live Updates | Mhada Lottery 2018 Live : विनोद शिर्के आणि अख्तर मोहम्मद 5 कोटी रुपयांच्या घराचे मानकरी 

Mhada Lottery 2018 Live : विनोद शिर्के आणि अख्तर मोहम्मद 5 कोटी रुपयांच्या घराचे मानकरी 

Next

मुंबईम्हाडाच्या मुंबई मंडळाच्या १ हजार ३८४ घरांसाठीच्या लॉटरीला सुरुवात झाली आहे. म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्यालयात ही सोडत जाहीर करण्यात येत आहे.  मुंबईच्या या वर्षीच्या आॅनलाइन लॉटरीकरिता १ लाख ६४ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी कोणाला घर मिळणार, हे आज जाहीर होणार असल्याने लॉटरीसाठी वाट बघणाऱ्या मुंबईकरांची प्रतीक्षा संपणार आहे. म्हाडाच्या संकेतस्थळावरून वेबकास्टिंगद्वारे या सोडतीचे थेट प्रक्षेपण करण्यात येत आहे. 

(खुशखबर! एक हजार, ३८४ घरांसाठीच्या म्हाडाच्या लॉटरीची आज सोडत)

LIVE - 

- धवलगिरी : ग्रँटरोड (367 ) 5.13 कोटी रुपये आणि (368) 5.80 कोटी रुपये
5 कोटी रुपयांच्या घराचे मानकरी विनोद शिर्के 
विनोद शिर्के हे आग्री पाड्यातील शिवसेना शाखाप्रमुख आहेत

- धवालगिरी :ग्रँट रोड ( 366) - घराची किंमत 4.99 कोटी रुपये
विजेता - अख्तर मोहम्मद

म्हाडात हॅटट्रीक,एकाच कुटुंबातील तीन सदस्यांना सोडतीत घर

एकाच कुटुंबात तीन विजेते

आई : रशीदा तडवी ( कांदिवली, मध्यम उत्पन्न गट )

वडील : लालमोहम्मद तडवी  (कांदिवली, मध्यम उत्पन्न गट)

रमीस तडवी (अॅन्टॉप हिल, अल्प उत्पन्न गट)

मुंबई म्हाडा लॉटरीला सुरुवात

घरांच्या सोडतीचं म्हाडाच्या संकेतस्थळावर लाइव्ह प्रक्षेपण

- पुढच्या वर्षी मुंबई लॉटरीमध्ये असणार दुप्पट घरं, जानेवारी महिन्यात कोकण मंडळाची 5,000 घरांची लॉटरी जाहीर होणार -  
गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांची घोषणा

- या वर्षी मुंबई लॉटरी मध्ये 1384 घरं आहेत , पुढच्या वर्षी यापेक्षा दुप्पट घरं असणार - प्रकाश मेहता

Web Title: Mumbai Mhada Lottery 2018 Live Updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.