‘मुंबई हॉटेल’ भारतात प्रदर्शित करणार नाही; ‘नेटफ्लिक्स’ची माघार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 05:39 AM2019-03-08T05:39:13+5:302019-03-08T05:39:24+5:30

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावर बनविण्यात आलेला चित्रपट ‘हॉटेल मुंबई’ हा भारत, सार्क देशांत दाखविणार नाही,

'Mumbai hotel' will not display in India; Netflix retreat | ‘मुंबई हॉटेल’ भारतात प्रदर्शित करणार नाही; ‘नेटफ्लिक्स’ची माघार

‘मुंबई हॉटेल’ भारतात प्रदर्शित करणार नाही; ‘नेटफ्लिक्स’ची माघार

googlenewsNext

मुंबई : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावर बनविण्यात आलेला चित्रपट ‘हॉटेल मुंबई’ हा भारत, सार्क देशांत दाखविणार नाही, अशी भूमिका नेटफ्लिक्सने घेतली आहे. कारण हा चित्रपट सार्क देशांत दाखविण्याचे अधिकार ‘प्लस होल्डिंग’ कंपनीने आॅस्ट्रेलियाच्या एका क्झेटगेइस्ट एंटरटेन्मेंट ग्रुपकडून खरेदी केले. मात्र, या कंपनीशी वाद झाल्याने ते निकाली काढेपर्यंत ‘हॉटेल मुंबई’ प्रदर्शित करण्याचे अधिकार कोणाला देऊ नयेत, यासाठी ‘पल्स होल्डिंग’ या दुबईच्या कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्यावर ‘हॉटेल मुंबई’ हा चित्रपट काढण्यात आला. यामध्ये अनुपम खेर व देव पटेल यांनी काम केले आहे. अलीकडेच टोरेन्टो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये तो दाखवण्यात आला. त्यानंतर तो भारतात दाखविण्याचे अधिकार दुबईच्या ‘प्लस होल्डिंग’ या कंपनीने आॅस्ट्रेलियाच्या कंपनीकडून खरेदी केले. मात्र, या कंपनीने बेकायदा ‘प्लस होल्डिंग’ कंपनीकडून चित्रपट प्रदर्शित करण्याचे अधिकार काढून घेतले. यासंदर्भात सिंगापूरच्या मध्यस्थी लवादापुढे याचिका दाखल आहे. सुनावणी प्रलंबित असताना नेटफ्लिक्स चित्रपट प्रदर्शित करणार असल्याचे प्लस होल्डिंगला समजले. ‘प्लस होल्डिंग’तर्फे अ‍ॅड. संदीप लड्डा यांनी उच्च न्यायालयात युक्तिवाद केला. न्यायालयाने आॅस्ट्रेलियाच्या एंटरटेन्मेंट कंपनीला या चित्रपटाचे अधिकार अन्य कोणत्याही कंपनीला न विकण्याचे अंतरिम आदेश दिले.

Web Title: 'Mumbai hotel' will not display in India; Netflix retreat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.