मुंबई-गोवा महामार्गावर 23 ते 25 डिसेंबरदरम्यान अवजड वाहनांना बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 08:29 PM2018-12-21T20:29:52+5:302018-12-21T20:34:59+5:30

मुंबई-गोवा हायवेवर 23 ते 25 डिसेंबरदरम्यान अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

Mumbai-Goa highway, the ban on heavy vehicle from December 23-25 | मुंबई-गोवा महामार्गावर 23 ते 25 डिसेंबरदरम्यान अवजड वाहनांना बंदी

मुंबई-गोवा महामार्गावर 23 ते 25 डिसेंबरदरम्यान अवजड वाहनांना बंदी

Next

मुंबई : मुंबई-गोवा हायवेवर 23 ते 25 डिसेंबरदरम्यान अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.


22 डिसेंबरपासून सरकारी कार्यालयांना सुटी असल्याने आणि नाताळ, नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्याकडे जाणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने मुंबई-गोवामहामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. यातच या हायवेचे चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. यामुळे अवजड वाहने या रस्त्यावर आल्यास वाहतुकीचा बोजवारा उडणार आहे. 


या कारणामुळे मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.


पर्यायी मार्ग वापरावा
नाताळच्या सुट्यांमुळे हा महामार्ग व्यस्त असणार असल्याने मुंबई-बेंगळूर या पर्यायी महामार्गाचा वापरही करता येऊ शकतो. टोलसाठी पैसे मोजावे लागणार असले तरीही मुंबई- गोवा महामार्गाचे काम सुरु असल्याने होणारी गैरसोय टाळता येऊ शकते. गगनबावडा घाट, फोंडा घाट, आंबोली घाट मार्गे कोकणात उतरता येऊ शकते. तसेच बेळगावमार्गेही गोव्याला जाता येते. यामुळे वाहनांची गर्दी टाळायची असल्यास वरील मार्गांचा वापर करावा. चिपळून, रत्नागिरीला फिरायला जायचे असल्यास खालापूर टोलनाक्यावरून इमॅजिका थिम पार्कच्या रोडने पुढे (खोपोली पाली रोड) थेट पालीला बाहेर पडता येते. यामुळे वडखळ नाक्यावरील 5-6 किमी लागणाऱ्या वाहनांच्या रांगा टाळता येतात. 

Web Title: Mumbai-Goa highway, the ban on heavy vehicle from December 23-25

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.