Mumbai faces fire; The eleventh incident of fire occurs every day | मुंबई आगीच्या तोंडावर; दिवसाला घडतात आगीच्या अकरा घटना
मुंबई आगीच्या तोंडावर; दिवसाला घडतात आगीच्या अकरा घटना

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील आगीचे सत्र अद्याप थांबलेले नाही. टिळकनगर येथील आगीत ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी रात्री पुन्हा एकदा टिळकनगर येथे आगीची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत मनुष्यहानी झाली नसली तरी मोठी वित्तहानी झाली. येथील आग शमते तोच कांदिवली पश्चिमेकडील चारकोप नाका येथील पटेल रबर कंपनीला शुक्रवारी दुपारी १च्या सुमारास आग लागली. आगीत सुदैवाने मनुष्यहानी झाली नसली तरी मोठी वित्तहानी झाली आहे. रात्री ८च्या सुमारास आग शमली असली तरी सातत्याने घडत असलेल्या आगीच्या घटनांमध्ये पुन्हा एकदा येथील अग्नी सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अग्नी प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी व्यवस्थित होत नसल्याने आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

मुंबई अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत दिवसाला सरासरी ११ आगीच्या दुर्घटना घडत असून, यात मोठ्या प्रमाणावर वित्तहानी होत आहे. मागील चार वर्षांत एकूण १९ हजार १४७ आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत. मुंबई अग्निशमन दलाने मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी अनेक उपक्रम हाती घेतले असून, त्या अंतर्गत मुंबईकरांना प्रशिक्षण देण्याचे काम केले जात आहे. विशेषत: सोसायट्यांमध्ये जनजागृती केली जात असून, ‘व्हॉलियेंटर प्रोग्राम’ असे या उपक्रमाचे नाव आहे. या अंतर्गत आगीपासून बचाव कसा करायचा? याची माहिती मुंबईकरांना दिली जात आहे.
खासगी स्तरासह सार्वजनिक स्तरावर आगीबाबत जनजागृती केली जात असून, मुंबईला सुरक्षित ठेवणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांगदळे यांनी सांगितले. मुंबई अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०१५ साली ५ हजार २१२ आगीच्या दुर्घटना घडल्या. या वर्षी एका दिवसाला घडत असलेल्या आगीच्या घटनांचा सरासरी आकडा हा १४ होता. २०१६ साली ५ हजार २१ आगीच्या घटना घडल्या.

गेल्या चार वर्षांत ५ हजार ६५८ इमारतींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३ हजार १८ इमारतींना नोटीस देण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे यापैकी ३४ इमारतींबाबत न्यायालयीन प्रकिया सुरू आहे.

च्२०१५ साली १ हजार ३०५ इमारतींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६६० इमारतींना नोटीस देण्यात आली. न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे; अशा इमारतींची संख्या ३ आहे.
च्२०१६ साली १ हजार ४७४ इमारतींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ८४८ इमारतींना नोटीस देण्यात आली. न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे; अशा इमारतींची संख्या ५ आहे.

कमला मिलमध्ये डिसेंबर २०१७ मध्ये घडलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर विशेष अग्नी सुरक्षा पालन कक्षाची निर्मिती करण्यात आली. या कक्षाद्वारे विशेष मोहिमेंतर्गत उपाहारगृहे, हॉटेल्स यांची तपासणी करण्यात येत असून, कारवाई करण्यात येत आहे. जानेवारी ते जुलै २०१८ कालावधीदरम्यान ३ हजार २६४ हॉटेल्स/उपाहारगृहांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १ हजार ८६७ हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली. या अंतर्गत दोन इमारतींवर न्यायलयीन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आॅगस्ट ते डिसेंबर २०१८ या कालावधीत १ हजार १७२ हॉटेल्सची तपासणी करण्यात आली. ३९७ हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली.

च्२०१७ साली १ हजार ८३२ इमारतींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १ हजार ३४ इमारतींना नोटीस देण्यात आली. न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे; अशा इमारतींची संख्या ३ आहे.
च्२०१८ साली १ हजार ४७ इमारतींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४७६ इमारतींना नोटीस देण्यात आली. न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे; अशा इमारतींची संख्या २३ आहे.

गोकूळ निवास इमारतीला लागलेल्या आगीनंतर सी-विभागात विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. या अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईचा तपशील
वर्ष तपासलेले बंद गाळे त्रुटी असलेले नोटीस
गाळे गाळे
२०१५ १२७७३ ——— २३२ २३२
२०१६ १३१६७ ३७७९ २१० १९८
२०१७ ७५४७ २३६५ २२१ २२०
एकूण ३३४८७ ६१४४ ६६३ ६५०

च् या वर्षी दिवसाला सरासरी १४ आगीच्या घटना घडल्या होत्या. २०१७ साली ४ हजार ९२७ आगीच्या घटना घडल्या. दिवसाला आगी लागण्याचे हे प्रमाण सरासरी १३ होते. २०१८ साली ३ हजार ९८७ आगीच्या दुर्घटना घडल्या. या वर्षी दिवसाला सरासरी आगीच्या ११ घटना घडत होत्या.

कुर्ल्यातील १७ उपाहारगृहांना अग्निशमन दलाची नोटीस

मुंबई : मुंबईत वाढत्या आगीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाने उपाहारगृह, आस्थापने, इमारतींची झाडाझडती सुरू केली आहे. त्यानुसार कुर्ला विभागातील तब्बल १७ उपाहारगृहांना आज नोटीस पाठविली आहे.
मुंबईत दररोज सरासरी १० ते १२ ठिकाणी छोट्या-मोठ्या आगीच्या घटना घडत असतात. यावर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाने मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार मुंबईतील सर्व उपाहारगृह, हॉटेल्स, उत्तुंग इमारती, आस्थापनांची तपासणी सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत शुक्रवारी अग्निशमन दलाने उपाहारगृहांची पाहणी केली. यामध्ये अग्निशमन कायद्याचे नियम मोडणाऱ्या १७ उपाहारगृहांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानुसार त्यांचा वीज आणि पाणीपुरवठा तोडण्यात येणार आहे, अशी सूचना पालिकेचे जल अभियंता खाते आणि बेस्ट उपक्रमाच्या विद्युत पुरवठा विभागाला देण्यात आली आहे.


Web Title: Mumbai faces fire; The eleventh incident of fire occurs every day
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.