Mumbai city district appointed five central election observers for the Lok Sabha elections | मुंबई शहर जिल्हा लोकसभा निवडणुकीसाठी पाच केंद्रीय निवडणूक निरीक्षक नियुक्त
मुंबई शहर जिल्हा लोकसभा निवडणुकीसाठी पाच केंद्रीय निवडणूक निरीक्षक नियुक्त

मुंबई : लोकसभा निवडणूक – 2019 अंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यासाठी निवडणूक आयोगामार्फत 5 केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली असून लवकरच ते मतदार संघात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिली.


 सर्वसामान्य केंद्रीय निरीक्षक म्हणुन संजय प्रसाद व शिल्पा गुप्ता तसेच पोलीस खात्यासाठी दीपक पुरोहित तसेच निवडणूक खर्चाचे केंद्रीय निरीक्षक म्हणून अभिषेक शर्मा व संतोष कुमार करनानी यांची नियुक्ती केंद्रशासनातर्फे करण्यात आली आहे.


यात मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघासाठी संजय प्रसाद हे 1995 च्या बॅचचे उत्तर प्रदेश कॅडरचे आय.ए.एस. अधिकारी आहेत. मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी शिल्पा गुप्ता या मध्यप्रदेश कॅडरच्या 2008 च्या बॅचच्या आय.ए.एस. अधिकारी आहेत. भारतीय पोलीस सेवेतील दिपक पुरोहित हे 2007 चे राजस्थान मध्ये आय.पी.एस. अधिकारी असुन त्यांच्याकडे मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण लोकसभा या दोन्ही मतदारसंघाची जबाबदारी आहे. तसेच भारतीय महसुल सेवेच्या 2005 च्या राजस्थान कॅडरचे संतोषकुमार करनानी यांच्याकडे मुंबई दक्षिणची जबबादारी असुन भारतीय रक्षा लेखा सेवेच्या 2004 च्या राजस्थान कॅडरचे अभिषेक शर्मा यांच्याकडे मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.


Web Title: Mumbai city district appointed five central election observers for the Lok Sabha elections
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.