मुंबई : विमानाच्या सीटखालून तब्बल साडेचार कोटींचं सोनं जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 01:10 PM2018-02-05T13:10:44+5:302018-02-05T13:14:12+5:30

मुंबई विमानतळावर विमानाच्या सीटखालून जवळपास साडेचार कोटी रूपयांचं सोनं जप्त करण्यात आलं आहे.

Mumbai Airport gold worth around rs 4 5 crore found under the seat of the aircraft | मुंबई : विमानाच्या सीटखालून तब्बल साडेचार कोटींचं सोनं जप्त

मुंबई : विमानाच्या सीटखालून तब्बल साडेचार कोटींचं सोनं जप्त

Next

मुंबई : मुंबई विमानतळावर विमानाच्या सीटखालून जवळपास साडेचार कोटी रूपयांचं सोनं जप्त करण्यात आलं आहे. तीन प्रवाशांनी आपल्या सीटखाली हे सोनं लपवलं होतं. शनिवारी महसूल गुप्तचर संचालनालयाने कारवाई करताना तीघांना अटक केली आहे. या तिघांनीही आपला गुन्हा कबूल केला असून सोनं लपवण्यासाठी त्यांना पैशांचं आमिश दिलं होतं अशी माहिती दिली आहे.  
मोहम्मद नावाच्या एका इसमाने दुबईमध्ये हे सोनं दिलं होतं. भारतात उतरल्यावर एक व्यक्ती येऊन हे सोनं घेईल असं त्याने सांगितलं होतं, अशी माहिती अटक करण्यात आलेले आरोपी इमरान तजनीम, फरहद शेख आणि धर्मेश सोनी यांनी दिली. पण मुंबई विमानतळावर उतरताच महसूल गुप्तचर संचालनालयाने तिघांनाही अटक केली आणि सोनं जप्त केलं. मोहम्मद याच्याबद्दल जास्त काही माहिती नसल्याचं या तिघांनी सांगितलं. 
 हे सोनं नेमकं कोण आणि कुठे घेऊन जाणार होतं याबाबत माहिती नसल्याचं आरोपींनी सांगितलं. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी सोनी आणि शेख हे मुंबईचे , तर इमरान दिल्लीचा रहिवासी आहे. अधिकारी त्यांची कसून चौकशी करत आहेत.   
 

Web Title: Mumbai Airport gold worth around rs 4 5 crore found under the seat of the aircraft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.